नांदेड(प्रतिनिधी)-मध्यरात्रीनंतर महामार्गावर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या एका मंडळाधिकाऱ्याला दरोडेखोरांनी लुटले आहे. बारड पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला आहे.
मंडळाधिकारी राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारीच्या मध्यरात्री पुढे 1 वाजता देगाव जवळील एका डी.पी.जवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. त्यावेळी त्यांचा सोबत त्यांचा मेहुणा होता. दोघांनी नैसर्गिक विधी करतांना नांदेडकडून आलेल्या दोन दुचाकींवर असलेल्या चार जणांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा 30 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला आहे. बारड पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 16/2022 भारतीय दंड संहितेच्या 392,34 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक वानोळे अधिक तपास करीत आहेत.
वनरक्षकाचे घरफोडले

किनवट येथील वनरक्षक माणिक हणमंत मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारी रोजी सकाळी 8.30 वाजता ते आणि त्यांचे कुटूंबिय गोकुंदा, किनवट येथील नारायण नगरमधील आपले घर बंद करून कांही कामासाठी बाहेरगावी गेले. घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत 16 फेबु्रवारीच्या सकाळी 8.30 वाजेदरम्यान त्यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 63 हजार 815 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
म्हैस चोरली

भेंडेगाव ता.लोहा येथील शेतकरी शिवाजी शेषराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भेंडगाव शिवारातील त्यांच्या शेताच्या आखाड्यावर बांधलेली 50 हजार रुपयांची म्हैस कोणी तरी 14 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास चोरून नेली आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार हंबर्डे करीत आहेत.