नांदेड(प्रतिनिधी)-14 फेबु्रवारी रोजी भेंडेगाव शिवारातून चोरीला गेलेली 50 हजार रुपयांची म्हैस सोनखेड पोलीसांनी आज हस्तगत करून हा चोरीचा गुन्हा उघड केला आहे.
14 फेबु्रवारी रोजी भेंडगाव ता.लोहा येथील शेतकरी शिवाजी शेषराव कदम यांनी आपली 50 हजार रुपयांची म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा क्रमांक 21/2022 दाखल झाला होता. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अशोक हंबर्डे यांनी बारकाईने तपास करून भेंडेगाव येथील चांदू बालाजी हेंगडे (30) यास ताब्यात घेतले आणि त्याने चोरलेली 50 हजार रुपयांची शिवाजी कदम यांची म्हैस हस्तगत केली आहे. हा गुन्हा 16 फेबु्रवारीच्या 00.30 वाजता दाखल झाला होता. आणि आज 17 फेबु्रवारीत तो उघडकीस आला आहे. सोनखेड पोलीसांच्या या कामगिरीचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केले आहे.
सोनखेड पोलीसांनी चोरीची म्हैस 24 तासात शोधली