नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलीस अति कर्तव्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कांही अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी वेगवर्धित पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात गडचिरोली जिल्हयातील तीन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. त्यांना पोलीस निरिक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे.
आपल्या सेवाकाळात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक वेगवर्धित पदोन्नती मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवतात. असाच एक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात वेगवर्धित पदोन्नती समितीने गडचिरोली जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदोन्नती देण्यास दि.20 मे 2014 रोजी मान्यता दिली.त्यात गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत संदीप पुंजा मंडलीक, राजेश ज्ञानोबा खांडवे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयात कार्यरत अमोल नानासाहेब फडतरे या तिघांना तात्पुर्ती वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. त् यांची नवीन पदस्थापना गडचिरोली जिल्ह्यातच करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या या निर्णयावर आस्थापना शाखेचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांची स्वाक्षरी आहे. हा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयाने महापोलीस संकेतस्थळावर फ्लॅश शिर्षाखाली प्रसिध्द केला आहे. यावरून पोलीस दलात आपल्या कर्तव्याची कामगिरी करतांना उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान होतोच उगीच पोलीस खात्यात आपल्या मर्जीप्रमाणे काही मिळत नाही अशी ओरड करण्यापेक्षा उत्कृष्ट काम करा आणि शाब्बासकी मिळवा असाच विषय आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरिक्षकांना वेगवर्धित पदोन्नतीने पोलीस निरिक्षक पद