नांदेड(प्रतिनिधी)- एका 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी सहयोगनगर भागात तोडली आहे. तसेच एका वयस्कर महिलेच्या गळ्यातील 4 तोळे सोन्याची पोत, 2 लाख रुपयांची बळजबरीने चोरण्यात आली आहे.
अनुराधा रमेशराव मंगलपल्ली रा.हैद्राबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेबु्रवारी रोजी सकाळी 8.45 वाजता त्या गोवर्धनघाट नांदेड येथील तेरवीचा कार्यक्रम आटोपून ऍटोमध्ये बसून सहयोगनगर येथे पोहचल्या. तेथे खाली उतरल्या आणि पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 5 तोळे सोन्याचे मंगळसुत्र, 70 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने तोडून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुंडे अधिक तपास करीत आहेत.
दादाराव अमृतराव देशमुख रा.आम्रगाव ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेबु्रवारीच्या सायंकाळी 5.45 वाजता माहुर गडाची आई रेणुका यांच्या पायथ्याशी त्यांचे आई-वडील कारमध्ये बसले असतांना कार पार्किंगचे पैसे कसे देत नाही म्हणून वाद घातला आणि आईच्या गळ्यातील 4 तोळे सोन्याची पोत किंमत 2 लाख रुपये असा ऐवज तोडून नेला आहे. माहुर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे अधिक तपास करीत आहेत.
दोन महिलांच्या गळ्यातील 2 लाख 70 हजार रुपयांचे मंगळसुत्र तोडले