
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराचा कावीळ या आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच एक सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक आपल्या 65 व्या वर्षी या जगाचा निरोप घेवून गेले आहेत.
पोलीस दलात कार्यरत राजू निवृत्तीराव शेंडगे यांचा उपचार भगवती रुग्णालयात सुरू असतांना आज 17 फेबु्रवारी रोजी त्यांचा काविळ या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यांनी आपल्या जीवनाची 30 वर्ष सेवा बजावली आहे. पोलीस मुख्यालय, मनपा, स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी त्यांनी नोकरी केली होती. बरेच वर्ष त्यांनी पोलीस अधिक्षकांचे अंगरक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे मुळ गाव लोहा आहे.
पुष्पनगर पावडेवाडी नाका येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक बाबाराव पाटील हंगरगेकर यांचे 65 व्या वर्षी 17 फेबु्रवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज 18 फेबु्रवारी रोजी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातू असा परिवार आहे.