मनपा स्थायी समितीने 17 कामांना मंजुरी दिली

नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत विविध 17 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्ष स्थायी समिती सभापती किशोर स्वामी हे होते.
महानगरपालिकेने प्रेसनोटप्रमाणे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शहराच्या विकासासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच मुख्य रस्त्यांची आणि इतर कामे सुरु करण्यात आली आहेत. या करीता अशोक चव्हाण यांचे अभिनंदन ठराव सुध्दा या बैठकीत पारीत करण्यात आले.
सभापती किशोर स्वामी यांनी गुंठेवारी कामा संदर्भाने अनेक तक्रारी प्राप्त होत असून गुंठेवारीची प्रकरणे 7 दिवसात निकाली काढण्याच्या सुचना केल्या. तसेच वास्तुशास्त्रज्ञामार्फत गुंठेवारी संचिका दाखल करतांना जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तेंव्हा शासनाने ठरवून दिलेल्या ठरावीक रक्कम घेण्यासाठी वास्तुशास्त्रज्ञांना सांगावे असे सुनिश्चित करण्यात आले. या बैठकीत वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याबाबत प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या कामासाठी 1183 चौरस फुट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बांधकामासाठीची ऑनलाईन प्रक्रिया बंद पडत असल्यामुळे जनतेचा त्रास कमी करण्यासाठी ऑफ लाईन अर्ज स्विकारून ही कामे जास्तीचा वेळ न लावता लवकर पुर्ण करावीत असे सांगण्यात आले. मनपाच्या आस्थापनेवरील मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या पाल्यांना लाड समितीच्या निर्णयानुसार कामावर घेण्याचे ठरले. महानगरपालिकेने जनतेचे आभार व्यक्त करतांना त्यांनी वेळेत भरलेल्या कराचा उल्लेख केला. गोदावरी नदीमध्ये घाण पाणी जात असल्याने त्यावर प्रक्रिया करून शुध्द पाणी नदीमध्ये जावे यासाठी बंदाघाट येथे 500 के.एल.डी. क्षमतेचे, श्रावस्तीनगर येथे 300केएलडी क्षमतेचे, गौतमनगर सांगवी येथे 250 केएलडी क्षमतेचे व गोवर्धनघाट येथे 300 केएलडी क्षमतेचे विकेंद्रीकरण, मलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याबाबतची निविदा मंजुर करण्यात आली. माता गुजरीजी विसावा उद्यानात सहासी खेळ उद्यान उभारण्याची निविदा मंजुर करण्यात आली.
आज बैठकीत मनपाचे अतिरिक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, सदस्य विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल हफीज, बालाजी जाधव, महेंद्र पिंपळे, राजू काळे यांच्यासह उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, डॉ.पंजाबराव खानसोळे यांच्यासह अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. इतर सदस्य व अधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *