नांदेड(प्रतिनिधी)-एका 65 वर्षीय महिलेला चांदीच्या बेड्या व दंड उजळवून देतो म्हणून तिला धोका देवून 65 तोळे चांदीची 36 तोळे चांदी केली. हा घटनाक्रम करणाऱ्या दोन जणांविरुध्द उस्माननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तेलंगवाडी ता.कंधार येथील शशिकलाबाई रमेश मुपडे (65) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तेलंगवाडी येथे दि.21 फेबु्रवारी रोजी सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरासमोर अंगणात त्या बसल्या असतांना दोन जण आले आणि त्यांनी आपल्याला चांदीचे दागिणे उजळवून देतो असे सांगितले. शशिकलाबाईने आपल्या चांदीच्या बेड्या व दंड त्यांना उजळविण्यासाठी दिल्या. 65 तोळे वजनाच्या या चांदीच्या साहित्याला या भामट्यांनी कोणते तरी पावडर लावून 36 तोळे केले. म्हणजे त्यांच्या चांदीतील 29 तोळे चांदी विश्र्वासघात करून घेवून टाकली. या चांदीची किंमत 15 हजार रुपये आहे. उस्माननगर पोलीसांनी मोहम्मद मुजाहिद्दीन मोहम्मद जब्बार अली(25) आणि मोहम्मद एजाज मोहम्मद सुद्दी दोघे रा.पचगनीया तहसील गोपालपुर जि.भरतपुर (बिहार) या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भारती करीत आहेत.
एका 65 वर्षीय महिलेला फसवून तिची 15 तोळे चांदी गायब केली