नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत टायर चोरी ; पेट्रोलपंपावरील लोकांना लुटले ; घर फोडले; तुर चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून टायर दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी 2 लाख 82 हजार 660 रुपयांचे टायर चोरून नेले आहेत. सिंदखेड येथे अंत्यविधीसाठी गेलेल्या एका कुटूंबाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 55 हजार 924 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. निळा शिवारात दुचाकी स्वाराला अडवून दोन जणांची 21 हजार रुपये रोख रक्कम लुटून नेण्यात आली आहे. फुलवळ ता.कंधार येथे उभ्या केलेल्या ट्रकमधील 15 क्विंटल तुरू 97 हजार 500 रुपयंाची चोरट्यांनी लांबवली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव येथे हणमंत लक्ष्मणराव आगळे यांची राज टायर्स ही दुकान चोरट्यांनी 20 फेबु्रवारीच्या सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेदरम्यान चोरट्यांनी फोडली. या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे टायर आणि स्टॉक रजिस्टर चोरून नेले आहे. चोरून नेलेल्या टायरची किंमत 2 लाख 82 हजार 660 रुपये असल्याचे तक्रारीत लिहिले आहे. चोरट्यांनी टायरचे स्टॉक रजिस्टर चोरून नेले याचे अनेक अर्थ असू शकतात. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक माननिय श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
गणेश शिवाजी सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सावरखेड ता.माहुर येथील आपले घर बंद करून 21 फेबु्रवारी रोजी रात्री 11 वाजता ते आणि त्यांचे कुटूंबिय आजोबाच्या अंत्यविधीसाठी गोजेगाव ता.मुखेड येथे गेले. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या खिडकीची तारे काडून आत प्रवेश केला आणि कपाटातील 6 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा 1 ल ाख 55 हजार 924रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. सिंदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भोंबळे अधिक तपास करीत आहेत.
मारोती प्रभाकर काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास निळा रस्त्यावर असलेल्या पावडे पेट्रोल पंपावर असतांना तीन जण एका गाडीवर आले आणि त्यांनी मारोती काळेला पिस्तुल सारख्या वस्तुचा धाक दाखवून पेट्रोल विक्री करून जमा झालेले 8 हजार आणि त्यांचा सहकारी मुंजाजी ज्ञानेश्र्वर कदम याच्याकडे जमा असलेले पेट्रोल विक्रीचे 13 हजार असे 21 हजार रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत. चोरी करून हे दरोडेखोर नांदेड रोडने पळून गेले. लिंबगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांवर वचक असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांतजी पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
शाम विठ्ठल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 फेबु्रवारी रोजी सकाळी 8 वाजता ते फुलवळ गावातील सह्याद्री धाब्याजवळ आले कारण त्यांनी तेथे आपला ट्रक उभा करून नावंद्याची वाडी येथे आपल्या गावाला गेले होते. आल्यावर ट्रकची परिस्थिती पाहिली असता त्यातून 15 क्विंटल तुर किंमत 97 हजार 500 रुपयांची कोणी तरी चोरट्यांनी ट्रकची दोरी कापून चोरून नेले होते. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *