
नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या जीवनात संत गाडगेबाबा यांच्या विचारावर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी केले.
धुप्पा येथील संत ज्ञानेश्र्वर प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय पाटील बोलत होते. श्री संत गाडगेबाबा यांीन आयुष्यभर स्वच्छता, शिक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन आणि आरोग्य या मानवी जीवनाचा उत्कर्ष करणाऱ्या विषयांवर काम केले आहे. संत गाडगेबाबा सांगायचे खायचे ताट विका पण शाळा शिक्षा यावरून शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व लक्षात येते. गावोगावी फिरून त्यांनी गावे झाडून स्वच्छ केली आणि संध्याकाळच्यावेळी प्रबोधन करून लोकांचे विचार स्वच्छ केले. याबदल्यात त्यांनी समाजाकडून कधीच काही घेतले नाही. यावरून त्यांच्यातला मोठेपणा लक्षात येतो. संत गाडगेबाबा यांचा वारसा चालविण्यासाठी संत ज्ञानेश्र्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर स्पर्धा सुरू करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गाडगेबाबांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचा काटेकोरपणा सन्माननिय माधवराव पाटील शेळगावकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
या प्रसंगी प्रा.कदम, जोशी, वानखेडे, बिरादार, मानकेश्र्वरे, सौ.पाटील, मुख्याध्यापक रावसाहेब ताटे, अब्दागिरे, महादवाड, डोंगळीकर, अटकळे, राजेंद्र पाटील, दोनतुलवाड, होटलप्पा, देशमुख, बिरादार, टी.एम.वाघमारे, हिमगिरे, मोहिते, वंकलवाड, सौ.हिमगिरे, संभाजी पाटील, हुसेन, मुंगडे, माधव वाढवणे, करीम साब, बाबुराव पल्लेवाड, कुंदन टेकाळे, गोपीनाथ बळेगाये, श्रीराम घाटोडे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.