सोनखेड येथे दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना स्थागुशाने कांही तासात पकडले

लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपाची लुट याच दरोडेखोरांनी केली
दोन दिवस पोलीस कोठडी
 नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पळून गेलेल्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने कांही तासातच गजाआड केले आहे.
दि.23 फेबु्रवारी रोजी मौजे वडेपुरी शिवारातील वन विभागाच्या गार्डनमध्ये सौरव संजय येरावार यास बंदुकीचा धाक दाखवून कांही जणांनी लुट केली आणि पळून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकाला कार्यान्वीत केले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने आपल्या कसबातील सर्व प्रकार वापरून विष्णुपूरी येथील रोहण राजू ससाणे (19) यास ताब्यात घेतले. तेंव्हा त्यांने माझ्यासोबत अजून तीन गुन्हेगार होते ही माहिती दिली. त्यातील दुसरा गणेश भुजंग मोरे (20) रा.शाहुनगर वाघाळा यालाही स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले. त्या दोघांनी ही पण कबुली दिली की, सौरभ येरावार आणि लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर केलेली लुट आम्हीच केलेली आहे. अशा प्रकारे दोन दरोड्याचे गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने 36 तासात उघड केले आहेत. चोरट्यांकडून त्यांनी दरोड्यासाठी वापरलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एक्स.8314 पोलीसांनी जप्त केलेली आहे.
या चोरट्यांनी सोनखेड परिसरात केलेल्या दरोड्याच्या घटनेचा गुन्हा क्रमांक 28/2022  असा आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार यांच्याकडे आहे. तसेच लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन लोकांकडून रोख रक्कमेची लुट केल्याचा गुन्हा क्रमांक 21/2022  असा आहे.या गुन्ह्याचा तपास चंद्रकांत पवार यांच्याकडे आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, अत्यंत दबंग, गुन्हेगारांवर वचक असणारे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, गंगाधर कदम, भारत केंद्रे, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, दादाराव श्रीरामे, शेख कलीम, हनुमानसिंह ठाकूर यांचा समावेश होता. 36 तासात दोन दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी कौतुक केले आहे.
पोलीस कोठडी 
आज पोलीस उप निरीक्षक चंदनसिंह परिहार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारानी दोन्ही दरोडेखोरांना लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून दरोड्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली.न्यायालयाने दोन दिवस अर्थात २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *