24 तासात शिवाजीनगर पोलीसांनी दुसरे गावठी पिस्तुल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गावठी पिस्तुलांचा वावर जास्तच झाला आहे. 24 तासाच्यावेळेत शिवाजीनगर पोलीसांनी दुसरा गावठी पिस्तुल पकडला आहे. ज्या माणसाकडे गावठी पिस्तुल सापडला आहे. त्याने अगोदरच जबरी चोरीचा गुन्हा केला असल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 75/2022 दाखल होता. हा जबरी चोरीचा घटनाक्रम नई अबादी येथील शेख इरफान शेख गुड्डू उर्फ कुबडा (23) याने घडविला असल्याची खात्री शिवाजीनगर पेालीसांना होती. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार संजय मुंडे, रामकिशन मोरे, शेख लियाकत, राजकुमार डोंगरे, मधुकर अवातिरक आदी शेख इरफानचा शोध घेत असतांना शिवाजीनगर डॉक्टर्सलेनमध्ये एक व्यक्ती पिस्तुलसह फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी त्याला पकडले तेंव्हा तो शेख इरफान शेख गुड्डू उर्फ कुबडा हाच होता. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल 45 हजार रुपये किंमतीचे आणि एक दुचाकी गाडी 85 हजार रुपये किंमतीची असा 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. शेख इरफान विरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 77/2022 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *