नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोनाने फक्त एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिला आहे. दोन जणांची कोरोनाबाधेतुन मुक्ती झाली आहे.आज दोन गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.28 फेबु्रवारी रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 01 नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.नांदेड मनपा विलगिकरणातून-02 दोन रुग्णांची सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 100042 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.35 टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपात एकच रुग्ण सापडला आहे. आज 711 अहवालांमध्ये 705 निगेटिव्ह आणि 01 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102757 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 00 आणि 01 अँटीजेन तपासणीत असे एकूण 01 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 05 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.आज कोरोनाचे 25 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-12, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-06,सरकारी रुग्णालय -05, खाजगी रुग्णालयात- 02, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 02 रुग्ण आहेत.
Related Posts
अपघात भरपाईपोटी सुमीत शिवाजी पवार यांना लोकअदालतीत 25 लाख 50 हजार रुपयाची भरपाई
▪️न्यायालयीन आवारात व्हीलचेअरवर असलेल्या सुमितला न्यायाधीशांनी जागेवर जाऊन निवड्यासह दिला धीर ▪️नांदेड येथील लोकअदालतीच्या माध्यमातून तब्बल 7 हजार 174…
गुरूराज हॉस्पीटलकडून जैविक कचऱ्याची चुक विल्हेवाट; 10 हजार दंड
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वजिराबाद भागातील डॉक्टर्सलेन येथील गुरूराज हॉस्पीटलने बायॉमेडिकल वेस्ट (जैविक कचरा) मनपाच्या घंटागाडीत टाकला म्हणून मनपाने गुरूराज हॉस्पीटलकडून 10 हजार रुपये…
नांदेड पोलीस बॅडमिंटन टिमची राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी वाटचाल
नांदेड,(प्रतिनिधी)- नागपूर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय बडमिंटन स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी आणि काही पोलीस अंमलदारानी चमकदार कामगिरी करत विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे.…