नरसी येथे घरफोडले, राज कॉर्नर भागात एटीएम फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी ता.नायगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 21 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. राजकॉर्नर येथील एक एटीएम मशीन फोडून त्यातून 50 रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. मरखेल येथे एका वॉलीबॉल खेळाडूचा आणि त्याच्या मित्राचा असे दोन 35 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरीला गेले आहेत. अमोल बार ऍन्ड रेस्टॉरंट येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
नरसी ता.नायगाव येथील ग्यानोबा संभाजी पांचाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 11 ते 27 फेबु्रवारीच्या पहाटे 4 वाजेदरम्यान त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 21 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार तमलुरे अधिक तपास करीत आहेत.
बालाजी सुभाष वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 27 फेबु्रवारीच्या मध्यरात्री 1 वाजता राजकॉर्नर येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएम मशीनची पहाणी केली असता त्या एटीएम मशीनमध्ये पैसे नसतांना त्यातून चोरीचा प्रयत्न झाला आणि मशीन तोडून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.डी.कांबळे हे करीत आहेत.
तहेसीन निजामोद्दीन आतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे शिक्षक आहेत. दि.25 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 ते 6.30 वाजेदरम्यान ते मरखेल येथील नेताजी सुभाष चंद्रबोस कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर वॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी त्यांच्या मैदानाबाहेर ठेवलेल्या कपड्यातून आणि त्यांच्या मित्राच्या दुचाकीतून दोन 35 हजार रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. मरखेल पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बी.एम.पुरी अधिक तपास करीत आहेत.
अमोल रामराव शेवटे यांनी 22 फेबु्रवारीला रात्री 10 ते 11.45 दरम्यान आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 वाय 4121 ही 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी अमोल बार ऍन्ड रेस्टॉरंट, सांगवी येथे उभी केली होती. ती चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार खंदारे हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *