पोलीसाच्या दक्षतेने हरवलेले पैशांचे पॉकिट मालकाला परत

नांदेड(प्रतिनिधी)-एक वडील आपल्या मुलाला कपडे खरेदी करून देण्यासाठी घरून निघाला पण दुर्देवाने त्याचे पैशांचे पॉकिट ऍटोमध्ये पडले. पण सुदैवाने ते पॉकिट एका पेालीस कर्मचार्‍याला सापडले आणि त्याने ते पैसे वजिराबाद पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या हस्ते त्याच्या खर्‍या मालकाला दिले.

नालंदानगर तरोडा येथील भारत मारोती हिंगोले हे आपल्या ५ ते ७ वर्षाच्या बालकाला सोबत घेवून तरोडा नाका येथून ऍटोमध्ये बसून वजिराबादकडे निघाले. प्रकार सायंकाळी ७ वाजताचा आहे. वजिराबादमध्ये उतरल्यानंतर त्यांना आपल्या मुलासाठी कपडे खरेदी करायचे होते. त्यांच्या पैशांच्या पॉकिटमध्ये जेमतेम १३०० रुपये होते. पण पॉकिट गहाळ झााले म्हणून ते परत आपल्या घरी नालंदानगर तरोडा येथे गेले. पण त्याच ऍटोमध्ये प्रवास करणारे पोलीस अंमलदार अशोक नारलावाड नेमणूक पोलीस ठाणे कुंटूर यांना ते पैशांचे पॉकिट मिळाले. अशोक नारलावार हे पोलीस असल्याने त्यांनी आपले अधिकारी वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांना हा घटनाक्रम सांगितला. शिवराज जमदडे यांनी अशोक नारलावारला वजिराबाद पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या हस्ते भारत मारोती हिंगोले यांचे पैशांचे पॉकिट यांना परत दिले. पोलीसांनी आपल्यासाठी घेतलेली दखल भारत हिंगोले आपल्या शब्दात हा क्षण मी विसरणार नाही असे सांगून व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *