सहा दरोडेखोरांना 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

स्थानिक गुन्हा शाखेने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सात जणांना पकडले त्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालक  
नांदेड (प्रतिनिधी)- दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सात गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे. त्यातील एक विधीसंघर्ष बालक आहे. या दरोडेखोरांमध्ये अनिल शेजुळेचा एक फरार आरोपी पण अटकेत आहे. 28 फेब्रुवारी रोजी मुदखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ढेंम्बरे यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गोविंद मुंडे, संजय केंद्रे, विठ्ठल शेळके, संग्राम केंद्रे, हुनमानसिंह ठाकूर, मोतीराम पवार,विलास कदम,अर्जुन शिंदे,शेख कलीम, बालाजी यादगीरवाड, दशरथ जांभळीकर, भानुदास वडजे पाटील,बजरंग बोडके, गजानन बैनवाड आदींच्या पथकांनी दररोज गस्त करताना 27 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजता बारड ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावर गॅस गोडाऊन जवळील गोडसे यांच्या शेतातील आखाड्यावर छापा मारला. त्याठिकाणी प्रदीप उर्फ बंटी श्रीराम श्रावणे (24) रा. लक्ष्मीनगर, पूसद जि. यवतमाळ, संतोष उर्फ चिंग्या साईनाथ तरटै (22) रा. खोब्रागडेनगर नांदेड, रवी नामदेव गायकवाड (20) रा. व्यंकटेशनगर मुदखेड, चंद्रकांत उर्फ मुनी गंगाधर सुरेशी (23) रा. कृष्णानगर मुदखेड, अभिषेक त्र्यंबकराव नागरे (19)रा. गिरगाव मालेगाव ता. अर्धापूर ह.मु. चैतन्यनगर नांदेड, परमानंद उर्फ विठ्ठल रामेश्वर गोडसे (40) रा. वाणी गल्ली बारड या सहा जणांसह एका विधीसंघर्ष बालकाला पकडले. पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या तक्रारीवरून बारड पोलिसांनी या दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा क्र. 20/2022 कलम 399, 402 भारतीय दंड संहिता आणि 3/25, 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास बारड येथील सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. तुगावे यांच्याकडे देण्यात आला.
एस.आर. तुगावे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी दरोडा टाकण्याच्या तयारीतील सहा जणांना मुदखेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायाधीश  ढेंम्बरे  यांनी या दरोडेखोरांना 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *