नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाला आहात तरी सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्यातील पोलीस जागृत ठेवा. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा पोलीस दल सदैव तुमच्या मदतीसाठी उभा राहिल असे प्रतिपादन मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी केले.
आज पोलीस सेवेतील विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त पाच पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप यांनी सन्मान करून निरोप दिला. याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ.अश्र्विनी जगताप म्हणाल्या की, पोलीस सेवा करत असतांना आपल्याला आलेल्या अडचणी आता येणार नाहीत. आता आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगता येईल. तरीपण आपल्यातील पोलीस समाप्त होणार नाही याची दक्षता घ्या. कारण तोच पोलीस भविष्यातील गुन्हेगारांबद्दल, समाजातील बदलांबद्दल आणि बेकायदेशीर कृत्यांबद्दल आम्हाला माहिती देईल. तुमच्या जीवनात सेवानिवृत्तीनंतर कांही अडचणी आल्या तर जिल्हा पोलीस दल आपल्या मदतीसाठी सैदव तयार असेल असे सांगितले.
आज पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुधाकर विठ्ठलराव देवकर(शहर वाहतुक शाखा), गंगाधर किशनराव कपाटे (पोलीस ठाणे माहूर), विद्यासागर विठ्ठलराव वैद्य(पोलीस ठाणे अर्धापूर), पोलीस हवालदार गणेश आनंदा मिटके (पोलीस ठाणे विमानतळ), जगन्नाथ सोमला राठोड (पोलीस ठाणे सिंदखेड ) हे पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. यांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात डॉ.अश्र्विनी जगताप यांनी सहकुटूंब सन्मान करून निरोप दिला.सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे याप्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार राखी कसबे आणि रुपा कानगुले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सेवानिवृत्तीनंतर सुध्दा आपल्यातील पोलीस जागृत ठेवा-डॉ.अश्र्विनी जगताप