नांदेड(प्रतिनिधी)-आक्सा कॉलनी अर्धापूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 6 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच मौजे धावरी ता.लोहा येथून 60 हजार रुपये किंमतीचे दोन बैल चोरट्यांनी लंपस केले आहेत.
आक्सा कॉलनी राहणाऱ्या मोहम्मद गौस मोहम्मद शकील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 फेबु्रवारीच्या सायंकाळी 6 ते 28 फेबु्रवारीच्या रात्री 1 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे सर्व कुटूंबिय आपल्या नातेवाईकाच्या घरी परभणी येथे गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे मेनगेटला लावलेले कुलूप तोउले व लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 6 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा चोरीचा गुन्हा दाखल केला असून एम.एन.दळवी अधिक तपास करीत आहेत.
मौजे धावरी ता.लोहा येथील गोपाल रोहिजी वाकडे यांच्या शेताच्या आखाड्यावर बांधलेले दोन 60 हजार रुपये किंमतीचे बैल कोणी तरी चोरट्यांनी 27-28 फेबु्रवारीच्या रात्री चोरून नेले आहेत. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार साखरे अधिक तपास करीत आहेत.
अर्धापूर येथे घरफोडून 1 लाखांचा ऐवज लंपास; धावरी ता.लोहा येथे दोन बैल चोरी