नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्यात तुरूंगात असणाऱ्या कैलास बिघानीयासह 9 आरोपींनी 26 फेबु्रवारीपासून तुरूंगातच उपोषण सुरू केल्याची माहिती कैलास बिघानीयाच्या पत्नी सौ.उज्वला बिघानीया यांनी दिली आहे. आरोपींना न्यायालय बदलून हवे आहे.
सौ.उज्वला कैलास बिघानीया यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 फेबु्रवारी पासून तुरूंगातच कैलास जगदीश बिघानीया, नितीन जगदीश बिघानिया, दिगंबर टोपाजी काकडे, सोमेश सुरेश कत्ते, मुंजाजी बालाजी धोंगडे, कृष्णा छगनसिंह परदेशी, गंगाधर अशोक भोकरे, मयुरेश सुरेश कत्ते आणि लक्ष्मण बालाजी मोरे यांनी दि.16 फेबु्रवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सुरू असलेला त्यांचा गुन्हा क्रमांक 176/2021 कलम 302 पोलीस ठाणे इतवारा या गुन्ह्यात त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय बांगर यांच्याकडून न्याय मिळण्याची आशा नाही. तसेच तुरूंग अधिक्षक सुभाष सोनवणे हे न्यायायलाची दिशाभुल करून आमच्याबाबत तक्रार नसतांना आमच्या जेल बदलीचा आदेश न्यायालयाकडे मागतात.आम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवले आहे आणि न्यायाधीश संजय बांगर साहेब आमच्याविरोधात असल्याने आम्हाला शिक्षा देण्याचे बोलतात. आम्हाला त्यांच्यापासून योग्य तो न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. आमच्या जेलबदलीचा आदेश विनाकारण दिला आहे. तरी आमच्या अर्जावर विचार व्हावा असे या अर्जात लिहिले आहे आणि आमचा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा नाही तर आम्ही 26 फेबु्रवारीपासून कारागृहात आमरण उपोषण करणार आहोत.
या अर्जाच्या प्रति देवून सौ.उज्वला कैलास बिघानीया यांनी सांगितले की, मकोका खटल्यातील आरोपी नितीन जगदीश बिघानीया याची प्रकृती आज अत्यंत खालावलेली आहे आणि त्यास योग्य उपचार दिले जात नाहीत.
