गोदावरी नदीत सापडले अर्धवट प्रेत; महिलेचे शरीर असावे ?

वजिराबाद पोलीसांचे या अर्धवट प्रेताची ओळख पटविण्यासाठी जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत भयानक प्रकार नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत पाहायला मिळाला आहे. गळ्यापासून खाली पोटापर्यंतचा एक मानवी भाग तरंगतांना सापडला आहे. सापडलेल्या मानवी शरिरावर महिलेचे एक अंतरवस्त्र असल्याने ती महिला असेल असे सांगता येते. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणाच्या घरातील महिला गायब असतील तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
शिवरात्रीची पहाट उजाडली आणि गोदावरी नदीत भयंकर प्रकार दिसला शहरातील बंदाघाटजवळ नदीमध्ये एक प्रेत तरंगतांना दिसले. नदीमध्ये भरपूर हिरवे शेवाळ तयार झाल्याने प्राथमिक दृष्टीने ते प्रेत आहे एवढे दिसत होते. त्यानंतर वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे व इतर अनेक पोलीस अंमलदार तेथे पोहचले आणि त्यांनी ते पाण्यात दिसणारे प्रेत बाहेर काढले. तेंव्हा सर्वांचे डोळे विस्फारण्याची वेळ आली.
नदीत दिसणारे प्रेत बाहेर काढल्यावर अर्धवटच होते. हे पुर्ण मानवी शरीर नाही. या शरिराचे दोन्ही हात नाहीत. पोटापासून खालचा भाग नाही. डोके नाही फक्त गळ्यापासून पोटापर्यंतचा शरीराचा भाग सापडला. या शरिरावर महिला वापरतात ते अंतरवस्त्र असल्याने ही महिला असेल असे सांगितले जात आहे. पोलीसांनी हे अर्धवट प्रेत नदीबाहेर काढले आहे. त्यावर वैद्यकीय प्रक्रिया होणार आहे. प्रेताचे इतर भाग जसे डोके, दोन्ही हात आणि पोटापासून खालचा संपूर्ण भाग नदीमध्ये शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, दिसत्या परिस्थितीनुसार आपल्या घरातील कोणी महिला गायब असेल तर अशा लोकांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याबद्दलची माहिती द्यावी. वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 किंवा पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9923696860 आणि पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांचा मोबाईल क्रमांक 9890630130 यावर सुध्दा या अर्धवट प्रेताबद्दल कोणास माहिती असेल तर देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *