महाशिवरात्र दिनी बळेगाव बंधाऱ्यात बुडून बालिकेचा मृत्यू

उमरी,(प्रतिनिधी)- महाशिवरात्र निमित बळेगाव येथे भावीक भक्त म्हणून वडिला सोबत गेलेल्या १४ वर्षीय मुलगी शिरोमणी होनशेट्टे  हिचा अंघोळ करतांना पाय घसरल्याने तोल जावून नदित पडून मृत्यू झाल आहे.
                      ही घटना १ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता घडली असुन भाविकात व बेलदारा गावात शोककळा पसरली आहे . उमरी तालुक्यातील बळेगाव (बंधारा )येथे दर वर्षी महाशिरात्र निमित उपास – तपास करून भावीक भक्त  गंगेला जावून अंघोळ करण्याची पद्धत आहे .असेच तालुक्यातील  बेलदारा येथिल भाविक भक्त म्हणून संपती होनशट्टे व त्यांची १४ वर्षाची इयत्ता सातवीत शिकत असलेली मुलगी शिरोमणी संपती ढगे असे दोघे सकाळी बळेगाव बंधाराच्या बाजुस भावीक भक्त जेथे अंघोळ करतात तेथे गेले.  तेथे मुलगी शिरोमणी ही नदीकिनारी अंघोळ करित असतांना शिरोमणी हीचा पाय घसरला तोल गेल्याने आणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बडून मृत्यू झाला.  वडिलाना ही पोहता येत नव्हते,तो पर्यंत शिरोमणीचे प्रेत मृत्यू अवस्थेत गंगेच्या पाण्यावर तरंगत होते.  बळेगाव येथिल नागरीकानी शिरोमणीचा मृतदेह  पाण्याबाहेर काढून तीच्या आई – वडिलाकडे दिला. बळेगाव येथे गंगा स्नान करण्यास आलेल्या भावीकात आणी बेलदरा गावात शोककळा पसरली असुन शिरोमणी होनशट्टे हिच्या मृत्यू बदल हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *