परभणी आणि बुलढाणा जिल्ह्याची वार्षिक तपासणीची जबाबदारी मधुकर पाण्डेय यांच्यावर
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक बुलढाणा आणि परभणी या दोन पोलीस अधिक्षक कार्यालयाची वार्षिक तपासणी 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान करणार आहेत. पण सीएम आणि डीएमची तपासणी एडीजी कसे करू शकतात हा एक नवीन प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
अपर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय यांनी 28 फेबु्रवारी रोजी जारी केलेल्या एका पत्रानुसार पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्या पत्राचा संदर्भ देवून घटक कार्यालयाची वार्षिक तपासणी सन 2021 दरम्यान आपल्याकडे बुलढाणा आणि परभणी जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम देण्यात आला आहे असे या पत्रात लिहिले आहे. पोलीस अधिक्षक बुलढाणा आणि पोलीस अधिक्षक परभणी यांनी 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या या वार्षिक घटक तपासणीसाठी आवश्यक ती तयारी करावी असे या पत्रात लिहिले ओह.
दि.6 मार्च रोजी मुंबई येथून अपर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय बुलढाणा करीता रवाना होतील. 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता त्यांचे बुलढाणा रेल्वे स्थानकावर आगमन होईल. 11 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालयास भेट.दुपारी 3 वाजता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुलाखत. दि.8 मार्च रोजी सुध्दा बुलढाणा जिल्ह्यात सकाळी 10 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांना भेट. सायंकाळी 4 वाजता गुन्हे परिषद. 9 फेबु्रवारी रोजी सकाळी 8 वाजता वार्षिक तपासणी अहवाल वाचन. सकाळी 11.30 वाजता परभणीकडे रवाना. दुपारी 4 वाजता परभणी येथे आगमन.4.30 वाजता पोलीस अधिक्षक कार्याल परभणी येथे भेट. सायंकाळी 7.30 वाजता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलाखती. 10 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांना भेट. दुपारी 4 वाजता गुन्हे परिषद. 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय परभणी येथील वार्षिक तपासणी अहवाल वाचन आणि दुपारी 1 वाजता परत मुंबईकडे रवाना असा अपर पोलीस महासंचालक मधुकर पाण्डेय यांचा परभणी व बुलढाणा जिल्हा तपासणी दौरा आहे.
सीएम आणि डीएमची तपासणी एडीजी करणार.
परभणीचे पोलीस अधिक्षक जयंत मिणा हे मीच परभणी जिल्ह्याचा मीच सीएम आणि डीएम आहे असे आपल्याच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगतात अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मग अशा सीएम आणि डीएमची तपासणी एडीजी कसे काय करू शकतात असा प्रश्न या तपासणी निमित्ताने समोर आला आहे. परभणी पोलीस अधिक्षक कार्यालयात होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलाखती काय-काय सत्य अपर पोलीस महासंचालकांसमोर आणतील हे 11 मार्च रोजी वार्षिक तपासणी अहवाल वाचन होईल तेंव्हा कळेल.