ट्रक चालकास प्राथमिक न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा न्यायालयात कायम

नांदेड(प्रतिनिधी) -सन 2011 मध्ये एका बालकाला धडक देवून पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला प्राथमिक न्यायालयाने सन 2019 मध्ये शिक्षा दिली ती शिक्षा जिल्हा न्यायालय भोकर येथे अतिरिक्त तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.डी.गाढवे यांनी काम केली आहे. त्यामुळे या ट्रक चालकाला आता तुरूंगात जाणे ठरले आहे.
दि.28 फेबु्रवारी 2011 रोजी भोकर येथील रेल्वे गेट जवळ एम.एच.26 एच.8530 या भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सोहेल बेग खदीर बेग(16) यास जोरदार धडक दिली आणि ट्रक घेवून ट्रक चालक पळून गेला. पण लोकांनी हा ट्रक नंबर पाहिला होता.त्यानुसार दिगंबर धोंडू देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भोकर पोलीसांनी ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.हा प्रकार 28 फेबु्रवारी 2011 च्या रात्री 10.30 वाजता घडला होता.
या प्रकरणी प्राथमिक न्यायालयामध्ये आर.सी.एस.232/2011 प्रामणे हा खटला चालला. त्यामध्ये उपलब्ध साक्षीदारांच्या आधारावर तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एन.पठाण यांनी ट्रक क्रमांक 8530 चा चालक अंकुश भिमराव राठोड यास कलम 279 प्रमाणे 3 महिने सक्त मजुरी आणि 500 रुपये रोख दंड तसेच कलम 304(अ) प्रमाणे दोन वर्ष सक्त मजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. कलम 134 आणि 187 मोटारवाहन कायद्याप्रमाणे 100 रुपये दंड ठोठावला. या सर्व शिक्षा त्याला एकत्रीत भोगायच्या होत्या.
या प्रकरणाचे अपील जिल्हा न्यायालय भोकर येथे सादर करण्यात आले. त्यात आज तदर्थ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.डी. गाढवे यांनी प्राथमिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे एका बालकाच्या मृत्यूस कारण ठरणाऱ्या ट्रक चालक अंकुश भिमराव राठोडला आता तुरुंगात जावेच लागेल. हा निर्णय जाहीर झाला तेंव्हा सहाय्यक सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुला (डांगे) हजर होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *