नांदेड(प्रतिनिधी)-देगावचाळीत दोन भावांचा खून आणि एक भाऊ गंभीर जखमी, त्यांचा सहकारी गंभीर जखमी या घटनेतील चार जणांना वजिराबाद पोलीसांनी पकडल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी चौघांना 9 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
1 मार्च 2021 रोजी शहरातील देगावचाळीमध्ये सकाळी कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन कुटूंबात भांडण झाले. त्यात चाकूने वार करून प्रफुल्ल दिगंबर राजभोज आणि संतोष दिगंबर राजभोज (33) या दोन बंधूंचा खून झाला. याच प्रकरणात संदीप दिगंबर राजभोज हा तिसरा भाऊ (27) आणि त्यांचा मित्र राहुल संजय धोंगडे (18) हे दोन जण गंभीर जखमी झाले. हा प्रकार पहाटे 4 वाजता घडला.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी खून आणि जिवघेणा हल्ला अशा सदरात गुन्हा दाखल करून विश्र्वजित मधुकर राजभोज (27), मधुकर निवृत्ती राजभोज (67), अभिजित मधुकर राजभोज(30) आणि अनिल वाढवे (35) अशा चार जणांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला.
दि.3 फेबु्रवारी रोजी शिवराज जमदडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या चार जणांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती विनंती 9 मार्च 2022 पर्यंत मंजुर केली आहे.
देगावचाळीत दोन भावांचा खून करणारे चार जण पोलीस कोठडीत