नांदेड (प्रतिनिधी)-अनिकेत उर्पâ सोनू कल्याणकर या नामवंत व्यक्तीवर जिवघेणा हल्ला केलेल्या प्रकरणातून मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी काही अटी लावून जामीन मंजूर केला आहे.
दि.११ ऑगस्ट २०२१ रोजी श्रीनगर भागातील आपल्या ऑफिसवर बसलेला अनिकेत उर्पâ सोनू कल्याणकरवर काही जणांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण सुदैवाने त्या हल्ल्यात त्याला इजा झाली नाही पण आरोपीविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या ३०७, १२० (ब), भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा क्र.२६८/२०२१ दाखल झाला.
या प्रकरणातील १२० (ब) म्हणजे कट रचणे या प्रकारात सोनू कल्याणकरने काय केले होते, ज्याच्यासाठी कट रचून सोनू कल्याणकरवर हल्ला करण्यात आला. हा खूप एक लांबलचक विषय आहे. हल्ला करुन मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळे हा खूप दिवस फरार होता. १३ जानेवारी २०२२ रोजी त्याला अटक झाली. त्यानंतर न्यायालयात जामीन मागितला तेंव्हा त्या गुन्ह्यातील दुसNया आरोपींना जामीन मिळाला होता.
या खटल्याचा युक्तीवाद लक्षात घेवून न्यायमूर्ती कमलकिशोर गौतम यांनी या गुन्ह्यातील बंदूक आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे आणि पुढील कायद्याची प्रक्रिया लांबलचक आहे. म्हणून मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळेला तुरुंगात ठेवणे गरजेची नाही अशी नोंद आपल्या निकालात करुन मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळेला जामीन मंजूर केला आहे.
या आदेशात न्यायालयाने मुक्तेश्वर मंगनाळेने पोलीस ठाणे भाग्यनगर बोलवेल तेंव्हा तेथे हजर राहण्यास सांगितले आहे. अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करु नये असे आदेशात लिहिले आहे. साक्षीदारांवर दबाब आणू नये, असेही लिहिले आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नांदेडच्या वर्तुळाकार सिमेत ५० किलोमीटरपर्यंत मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळेला वास्तव्य करता येणार नाही. गोलू मंगनाळेने आपण कोठे जाणार आहोत आणि तेथील पोलीस स्टेशन कोणते आहे याबाबतची माहिती गुन्हा क्र.२६८ च्या तपासिक अंमलदाराला द्यावी, असे आदेशात म्हंटले आहे. या जामीन प्रकरणात मुक्तेश्वर उर्पâ गोलू मंगनाळेची बाजू अॅड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांनी मांडली.
नामांकित व्यक्ती सोनू कल्याणकरवर हल्ला करणारा गोलू मंगनाळे आता जामीनीवर