नांदेड(प्रतिनिधी)-व्हिसल ब्लोअर(खबऱ्या), माहिती अधिकार कार्यकर्ता, नगरसेवक, समाजसेवक एवढ्या पदव्या असतांना गुन्हे दाखल झाल्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्याला सुट्टीच्या दिवशी सुध्दा भेटता येते आणि त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करून घेता येतात. हा एक नवीन प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे.
एका सुट्टीच्या दिवशी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन हे आपल्या छोट्या कन्येला घेवून कार्यालयात आले होते. त्यावेळी व्हिसल ब्लोअर (खबऱ्या), माहिती अधिकार कार्यकर्ता, समाजसेवक अशी अनेक पदे स्वत:च धारण करणारा शेख जाकीर शेख सगीर हा सुध्दा दोन्ही हात बांधून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्यासमोर उभा होता. याप्रसंगाचा फोटा काढण्यात आला आणि हा फोटो विविध व्हाटसऍप संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला. तो फोटो आम्हाला प्राप्त झाला तेंव्हा या फोटोमध्ये शेख जाकीर शेख सगीर फोटो काढणाऱ्या व्यक्तीकडेच पाहत आहे असे दिसते.
नांदेड जिल्ह्यात व्हिसल ब्लोअर (खबऱ्या) असणाऱ्या शेख जाकीर शेख सगीरने हा फोटो व्हायरल करून त्याचा काय-काय फायदा घेतला याची पुर्ण माहिती प्राप्त झाली नाही. एवढी मोठी-मोठी पदे धारण करणाऱ्या शेख जाकीरवर विनयभंगाचा गुन्हा सुध्दा दाखल आहे. तरीपण जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना त्याच्यासोबत फोटो काढावाच वाटतो आणि असेच घडते आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही विभागाच्या व्यक्तीविरुध्द तक्रार असेल तर ती तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात शेख जाकीर शेख सगीर देतो, त्याच दिवशी त्याने दिलेल्या अर्जावर महसुल विभागाचे अत्यंत प्रामाणिक अधिकारी पृष्ठांकन करतात आणि पुढे मग काय-काय होते हे लिहिल्यावर आम्हाला एखाद्या अबु्र नुकसानीच्या खटल्याला सामोरे जावे लागेल. आजपर्यंत असे दोन खोटे आमच्याविरुध्द खटले सुरू आहेत.पण प्रगल्भ भारतीय लोकशाहीमध्ये असे व्हिसल ब्लोअर (खबऱ्या), समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ता आणि नगरसेवक यांचीच चलती आहे. यावर काय लिहावे. अर्धापूर नगर पंचायतीमध्ये कोणाच्या तरी दुर्देवाने नगरसेवक पद मिळाले. त्या ठिकाणी एकूण नगरसेवकांची संख्या 17 आहे. पण हा एकच नगरसेवक समाजाच्या भल्यासाठी काम करतो म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन त्याला नेहमीच आपल्या जवळील सर्व मदत देतात हे सुध्दा तेव्हढेच खरे आहे. सुट्टीच्या दिवशी झालेल्या या भेटीचा फोटो शेख जाकीरने व्हायरल करून काय साध्य केले. याचा शोध सुध्दा डॉ.विपीन यांनीच घ्यायला हवा. कारण सुट्टीच्या दिवशी काम काजच तर नसतेच. अत्यंत तातडीचे असते. पण अत्यंत तातडीच्या वेळी शेख जाकीर सोबत फोटो काढायला डॉ.विपीन यांना वेळ आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या कामाला डॉ.विपीन हे किती वेळ देत असतील? पत्रकारांना आपल्या अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला दिवाळी चांगली साजरी करायची नाही काय असा संदेश देणाऱ्या डॉ.विपीन यांनी सर्व सत्यता जाणून घेण्याची गरज आहे.
सुट्टीच्या दिवशी कार्यालयात गुन्हा दाखल झालेल्या खबऱ्याला भेटतात जिल्हाधिकारी ; खबऱ्या करतो फोटो व्हायरल