नांदेड(प्रतिनिधी)-जातीचे खोटे प्रमाणपत्र वापरून एका व्यक्तीविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करणाऱ्यावर आता फसवणूक, खोटे कागदपत्र खरे भासवणे आदी सदरांखाली मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुधाकर हनमंत टेकाळे यांच्याविरुध्द गणपत गंगाराम आनपलवाड यांनी ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करायला लावला होता. यानंतर सुधाकर टेकाळे यांनी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कायद्यान्वये गणपत आनपलवाडचे जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 30 एप्रिल 2019 रोजी अर्ज केला. ही मागणी मान्य करण्यासाठी त्यांना तहसील कार्यालय मुखेड येथे उपोषण करावे लागले. त्यानंतर तहसील कार्यालयाने जा.क्रं.सी.आर.क्रं.1991/एच.यु.टी.एस./सी.आर.110/92 दिनांक 28/07/1991 हे प्रमाणपत्र तहसीलक कार्यालय मुखेड यांनी निर्गमित केलेल नसल्याची माहिती सुधाकर टेकाळे यांना दिली. या पत्रानुसार 27 मे 2019 रोजी सुधाकर हनमंत टेकाळे विरुध्द गणपत आनपलवाड यांनी खोटे आणि बनावट महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र दाखवून त्यांच्याविरुध्द केलेला ऍट्रॉसिटीचा गुन्हा चुकीचा आहे, खोटे जातीचे प्रमाणपत्र बनविणे. बनावट प्रमाणपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवले आणि शासनाची फसवणूक केली अशा आशयाच्या तक्रारीवरुन मुखेड न्यायालयाने मुखेड पोलीसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 420,467 आणि 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा 72/2022 दाखल केलेला आहे. या गुन्ह्याचा तपास मुखेडचे पोलीस निरिक्षक व्ही.व्ही. गोबाडे हे करीत आहेत.
जातीच्या खोट्या प्रमाणपत्राआधारावर ऍट्रॉसिटी दाखल करणाऱ्यावर आता फसवणूकीचा गुन्हा