नांदेडमध्ये कार्यरत 20 पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 848 पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर पदोन्नती दिली आहे. यात नांदेडचे 20 पोलीस उपनिरिक्षक आहेत. सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे आणि त्यांनी मागितलेल्या पसंतीच्या महसुल संवर्गात बदल्या देण्यात आल्या आहेत. पण 145 जणांना आपल्या पसंतीचा महसुल संवर्ग उपलब्ध जागांच्या प्रमाणात मिळू शकला नाही. हे आदेश पोलीस महासंचालकांच्या मान्यतेनंतर अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी निर्गमित केले आहेत.
राज्यातील 448 पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यात नांदेडचे 20 जण आहेत. ही पदोन्नती यादी पाहिली तर सर्वाधिक नियुक्त्या कोकण-2 या महसुल विभागात करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस उपनिरिक्षकांनी पसंतीचे महसुल संवर्ग दिले होते. त्यांना चक्राकार पध्दतीने ते मंजुर करण्यात आले आहेत. ज्या 145 जणांना आपल्या पसंतीचे महसुल संवर्ग प्राप्त झाले नाहीत त्या सर्वांना कोकण-2 या संवर्ग विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. पण नांदेडच्या एका पोलीस उपनिरिक्षकाचे नाव दोन्ही याद्यांमध्ये आहे.
नांदेड येथून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अशी पदोन्नती प्राप्त करुन पुणे विभागात जाणारे पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. अमोल पंढरी पन्हाळकर, नागनाथ गुरुबसप्पा सनगले, बसवेश्र्वर रामचंद्र जाकीकोरे, राम हनुमंत गिते-पुणे, विठ्ठल किशनराव दुरपडे, प्रदीप गोपाळराव अल्लापुरकर, रुपाली गौतमराव कांबळे-औरंगाबाद, संदीप बाबूराव थडवे, बाबासाहेब पाराजी थोरे, जावेद शब्बीर शेख, अनिता विठ्ठलराव दिनकर, दिपक कल्याणराव फोलाने, ज्ञानोबा त्र्यंबक मुलगिर, महेश कल्याणसिंह ठाकूर, गोविंद विजयराव खैरे, सौमित्रा रामराव मुंडे, गणेश हरीशचंद्र होळकर, शिवराज बाबूराव थडवे, नवाज जमालसाब शेख-कोकण 2, सुदाम मारोती मुंडे-नागपूर अशा 20 नांदेडच्या पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती प्राप्त झाली आहे. यात बसवेश्र्वर रामचंद्र जाकीकोरे यांना एकीकडे पुणे विभाग दाखवला आहे तर याच यादीत जाकीकोरे यांचे नाव पसंतीचे महसुल संवर्ग न मिळाल्यामुळे त्यांना कोकण 2 असे नाव सुध्दा दाखविण्यात आले आहे.
नांदेड येथे अगोदर कार्यरत असलेले हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत शिवसांभ घेवारे यांना औरंगाबाद संवर्ग देण्यात आला आहे. नांदेडमध्ये पुर्वी कार्यरत असलेले आणि सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले किरण पठारे यांना पुणे संवर्ग देण्यात आला आहे. सर्व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांना शुभकामना देत पोलीस महासंचाल कार्यालयाने त्यांच्याकडून भविष्यात उत्तम कामाची अपेक्षा केली आहे.
राज्यात 848 फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षक पदोन्नती