महालोक न्यायालयावर वकीलांचा बहिष्कार; ऍड. ढवळे विरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आज महालोक अदालतीदरम्यान वकिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द ऍड. जयपाल मधुकर ढवळे यांनी आपल्या अंगावर डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता वजिराबाद पोलीसांनी त्यांनी पकडले आहे. त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 309 नुसार गुन्हा क्रमांक 70/2022 दाखल करण्यात आला आहे.
आज दि.12 मार्च रोजी जिल्हा न्यायालय परिसरात महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. वकील संघटनांनी या लोक अदालतीवर बहिष्कार टाकला होता. त्याची विविध कारणे आहेत. सकाळी 11 वाजेनंतर ऍड. जयपाल मधुकर ढवळे हे न्यायालयाच्या मुख्यद्वारावर आले आणि आपल्या अंगावर डिझेल टाकून त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता वजिराबाद पोलीसांनी त्यांनी पकडले. या अगोदर जयपाल ढवळे यांनी कोणत्याही वकीलावर अन्यायाविरोधात मी आत्मदहन करणार असल्याचे एक जाहीर आत्महदन असे लिहून आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केले होते. यामध्ये जे कोणी वकीलांवर अन्याय करतात (न्यायाधिक्ष) तसेच समाजातील गावगुंड यांच्याविरोधात आपण निर्णय घेतला आहे असे त्यात लिहिले आहे.
वजिराबादचे पोलीस कर्मचारी माधव मरीकुंटेलु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरिक्षक अब्दुल रब, पोलीस अंमलदार परदेशी, विजयकुमार नंदे, व्यंकट गंगुलवार, टर्के, शेख इमरान हे न्यायालयाजवळ असतांना दुपारी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी जयपाल मधुकर ढवळे या वकीलाला पकडले कारण त्यांनी स्वत:च्या अंगावर डिझेल टाकून आपल्या हातातील काडी पेटीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरुध्द माझी भादवी कलम 309 प्रमाणे फिर्याद आहे. यावरून वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार डोईवार यांच्याकडे देण्यात आला आहे. 309 या कलमामध्ये एक वर्षाची शिक्षा असल्याने ऍड. जयपाल ढवळे यांना जामीन देणे बंधनकारकच आहे. परंतू वृत्तलिहिपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण झाली होती की, नाही याबद्दल माहिती नाही.
