नांदेड (प्रतिनिधी) – 12 मार्चच्या रात्री काही हल्लेखोरांच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी असून सध्या तो बोलण्याच्या स्थितीत नाही, त्यामुळे अद्यापपर्यंत पोलीस ठाणे भाग्यनगर येथे याबाबत गुन्ह्याची नोंद झाली नाही.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार मोर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेलकम पार्लरचे मालक साहेबराव केरबा शिंदे यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला. यासाठी कारण असे आहे की, त्याच्या दुकानातील वस्तरा मागितला होता, पण त्याने तो दिला नाही. म्हणून लोखंडी गजाळीच्या सहाय्याने काही जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. त्याच्यावर रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आज दि. 13 मार्च रोजी जखमी असलेला साहेबराव केरबा शिंदे हा बोलण्याच्या अवस्थेत नाही. त्यामुळे अद्याप या प्रकरणीच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. भाग्यनगरच पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जखमी व्यक्तीची प्रकृती सुधारताच आम्ही योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहोत.