जिल्हा माहिती अधिकारी आणि छायाचित्रकारात जुंपली

नांदेड(प्रतिनिधी)- रुल नं.1 -बॉस इज ऑलवेज राईट, रुल नं.2 -इफ ही इज रॉंग दॅन सी रुल नं.1 या इंग्रजी म्हणीप्रमाणे शासकीय कार्यालयात फक्त छायाचित्रकार असणाऱ्या विजय होकर्णेने आपले अधिकारी विनोद रापतवार यांच्यासोबत घेतलेली झुंज त्यांनाच महागात पडली आणि सध्या ते उपचार घेत आहेत.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय असते. अत्यंत मोठ्या नेत्याच्या मेहरबानीने नांदेड येथील विजय होकर्णे यांची नियुक्ती जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे छायाचित्रकार या पदावर झाली. मोठ्या नेत्याचे छत्र आपल्या डोक्यावर असल्या कारणाने छायाचित्रीकरणासह विजय होकर्णे हळूहळू राजकारण पण शिकले आणि त्याचा फायदा पण घेत राहिले. ईतिहासात अनेक असे जिल्हा माहिती अधिकारी होवून गेले जे स्वत: त्या कार्यालयाचे प्रमुख असतांना काम मात्र विजय होकर्णे यांच्या मार्गदर्शनावरच करत होते. हा प्रकार असंख्य वर्ष सुरू होता. विजय होकर्णे यांच्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या पाठीमागे मोठ्या नेत्यांसह कांही सर्व सामान्य मंडळीपण होती. पण एखाद्यावेळेस आपली पद स्थिती उच्च झाली तर सर्व सामान्य माणसाची आठवण त्या उच्च पदावर येत नाही. हे सुध्दा तेवढेच खरे आहे आणि असेच कांही विजय होकर्णेंच्या स्वभावात झाले.
विनोद रापतवार यांची नियुक्ती नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारी पदावर करून घेण्यात सुध्दा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे अनेक जाणकार सांगतात. त्यामुळे मागे होवू गेलेल्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या लाईनमध्येच रापतवार वागतील असा होकर्णे यांचा समज होता तो चुकीचा पण नव्हता. खरी ठिणगी पडली भारताचे गृहमंत्री अमित शहा मुदखेड येथील केंद्रीय राखीव दलाच्या कार्यक्रमाला 17 सप्टेंबर रोजी आले होते. त्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो. तसेच त्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्यांचे निधन झाले होते. असे अनेक कार्यक्रम होते. प्राप्त माहितीनुसार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या मते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमांच्या बातम्या कव्हर करण्यासाठी पीआयबी खाते आहे म्हणून विजय होकर्णेंनी त्या कार्यक्रमात जायला नको होते. पण ज्या विनोद रापतवारांनी ज्या अधिकाऱ्यांचे ऐकून पत्रकारांची दिवाळी खराब करण्याचे शब्द वापरले होते. त्याच अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून विजय होकर्णे अमित शहा यांच्या कार्यक्रमात गेले होते. याची माहिती बहुदा विनोद रापतवारांना नसावी. पण आपल्या मनात ही बाब विनोद रापतवार यांनी साठवून ठेवली. म्हणूनच विचारवंत म्हणतात “सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे, आजचा दिवस स्वत:च्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे.’. पण आपल्या जीवनात एखादी गोष्ट आपल्या मनात घर करून गेली तर ती तशीच राहते.
दुसरीकडे विजय होकर्णे यांना असे वाटतच राहत होते की, माझ्या शिफारशीनेच रापतवार नांदेडचे अधिकारी आहेत. हे ठरवून त्यांनी आपल्या मनात ही बाब बसवली की, “तन गई है मुठ्ठीयां आकाश में, खोट आये है निकल विश्र्वास में..,आज के अस्तित्व को हम रौंद कर, खोजते है अस्मिता ईतिहास में..’. आणि यातून काल दि.12 मार्च रोजी कांही बालकांना शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदय उपचारासाठी पाठवले आणि त्यातून दबलेला वाद पुन्हा उफाळला आणि जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आणि जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यात जुंपली. या परिणामात विजय होकर्णे यांचा रक्तदाब वाढला. सुरूवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवले आज वृत्त लिहिपर्यंत तरी ते दवाखान्यातच आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बॉस हा नेहमी बॉसच असतो आणि तो चुकला असेल तरीही तो बॉसच असतो. बहुदा याचा विसर विजय होकर्णेंना झाला यावर आम्ही असे उल्लेखीत करू इच्छीतो की, आरसा पण काय कमाल करतो ना. आपलेच चित्र आपल्यालाच दाखवतो. या सर्व प्रकारामध्ये नक्कीच असे व्हायला हवे की, “एकीकडे धागे आपसात गुंतता आणि जवळ येतात.. आणि दुसरीकडे नाते एक दुसऱ्यासोबत गुंतागुंत झाले तर तुटून जातात..’. श्री विजय होकर्णेंजींना अत्यंत जलदगतीने आरोग्य पुन्हा बलदाई होवो या शुभेच्छांसह त्यांना सांगायचे आहे की, “काटेंगे तो उम्र है.. जियेंगे तो जिंदगी है..’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *