नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जांभरुन ता.अर्धापूर येथे मालकाच्या घरात चोरून करून नोकरानेच 2 लाख 44 हजार 114 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
जांभरुन येथील कोंडीबा माधव जिंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारी 2022 रोजी त्यांच्या घरी मौजे जांभरून ता.अर्धापूर येथे त्यांच्या शेताच्या आणि घरच्या कामासाठी नोकरी करत असलेल्या गंगाधर पंडित भोळे (४०)या व्यक्तीने घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे, किंमत 2 लाख 44 हजार 114 रुपयांचे चोरून नेले आहेत. या प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 58/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक कपिल आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नोकरानेच मालकाचे घर धुतले;2 लाख 44 हजारांचे दागिणे चोरले