नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेत एकूण 28 विषयांना मंजुरी दिली. तसेच 141.86 कोटी रुपये किंमतीच्या कामांच्या निविदा मंजुर केल्या आहेत.
आजच्या बैठकीत गुंठेवारी प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. अशा सुचना दिल्या. आकृतीबंध बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो तयार करावा. त्यातील त्रुटी दुरूस्त करून शासनाकडून त्याला मंजुरी मिळवावी अशा सुचना दिल्या. रमाई आवास योजनेअंतर्गत मंजुर लाभार्थ्यांची यादी मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याची सुचना दिली. आजच्या बैठकीत 100 कोटी रुपयांच्या कामापैकी 86.30 कोटी आणि 50 कोटी पैकी 47.91 कोटी व 7.65 कोटी अशा एकूण 141.86 कोटी रुपयांच्या निविदा मंजुर केल्या.
आजच्या बैठकीत आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, शुभम क्यातमवार, स्थायी समिती सदस्य विरेंद्रसिंघ गाडीवाले, अब्दुल हफीज, बालाजी जाधव, राजु काळे, अब्दुल अलीम खान, महेंद्र पिंपळे, रेहाना बेगम कुरेशी चॉंद पाशा, फरहत सुलताना कुरशीद अनवर, शांता संभाजी गोरे, नगरसचिव अजितपालसिंघ संधू आणि मनपाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
मनपाच्या स्थायी समितीने 141.86 कोटीच्या निविदा मंजुर केल्या