
नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेतील पदाधिकारी आणि अधिकारी आम्ही किती मेहनत घे आहोत हे दाखवतात ते किती सपशेल खोटे आहे, ते डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पच्या वितरिकेतून नाश होणाऱ्या पाण्याने स्पष्ट पणे दिसते.रात्री या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.पण कोणीही मनपाचा किंवा पाटबंधारे प्रकल्पाचा अधिकारी,नांदेड शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच नागरिक यांना या नाश होत जाणाऱ्या पाण्याशी काही एक घेणे देणे नाही असेच दिसते आहे.
आज पहाटे पहाटे एक व्हिडीओ अनेक सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाला.रात्रीच्या काळोखात आणि पौर्णिमेच्या उजेडात जल वितरण वितरिकेतून पाण्याचे उडणारे फवारे अत्यंत लोम हर्षक दिसत होते.कोणीतरी हा सुंदर प्रसंग आपल्या कैमेऱ्यात कैद केला आणि सर्वत्र व्हायरल केला आहे.हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना नक्कीच आनंद आला असेल.आज होळी सणाच्या पार्श्वभूमीवरपाण्याची नासाडी करू नका,पाण्याची किंमत अनमोल आहे,जल हेच जीवन आहे अश्या शब्दांमध्ये नांदेडच्या नागरिकांना भाषण देणारे नेते,अधिकारी यांनी सुद्धा पाण्याचे उडणारे सुंदर फवारे पाहिलेच असतील ना मग त्यांना याबाबत काही करावे असे वाटलेच माही.
मार्च महिन्यातच उन्हाने कहर सुरु केला आहे.तेव्हा एप्रिल आणि मे महिन्यात ऊन किती वाढणार आणि त्यासाठी पाणी किती आवश्यक आहे.याचे भान कोण ठेवणार ? रात्री पासून लाखो लिटर किंबहुना दशलक्ष घन मीटर पाणी वाहून जात आहे,कोण आहे या बाबतचा जबाबदार ? पण शोधणार कोण सर्वच जण एकाच माळेतील मणी आहेत.ती माळ नामस्मरण करण्यासाठी उपयोगी नाही आणि गळ्यात धारण करण्यासाठी सुद्धा देखणी नाही. जाऊ द्या पण नागरिक सुद्धा गप्प का ? नाश होणाऱ्या पाण्यातून त्यांच्यासाठीच पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.एखादा व्यक्ती अदखलपात्र गुन्ह्यात आला तर रात्रभर त्यासाठी रान पेटवणारे नागरिक सुद्धा हे फवारे अर्थात पाण्याची नासाडी पाहून मजाच घेत होते. पाण्याची नासाडी हे आपले नुकसान आहे,याची जाणीव जनतेने पण ठेवायला हवी तरच जगातील प्रगल्भ लोकशाही भारतात कायम राहील.
