६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा लातूर- नांदेड केंद्रातून “टकले रे टकले” प्रथम

नांदेड(प्रतिनिधी)-    ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड – लातूर केंद्रातून स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड या संस्थेच्या “टकले रे टकले” या नाटकाला प्रथम पारितोषिक, तसेच तन्मय ग्रुप नांदेड या संस्थेच्या “२८ युगांपासून मी एकटी” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नांदेड – लातूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे
              झपूर्झा फाउंडेशन, परभणी या संस्थेच्या “अस्वस्थ वल्ली” या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक श्याम डुकरे (नाटक: टकले रे टकले) द्वितीय पारितोषिक नाथा चितळे (नाटक: २८ युगांपासून मी एकटी) प्रकाशयोजना  प्रथम पारितोषिक अमोल काळे (नाटक:२८ युगान पासून मी एकटी) द्वितीय पारितोषिक नारायण त्यारे (नाटक : टकले रे टकले) नेपथ्य प्रथम पारितोषिक वनिता राऊत (नाटक : सेल्फी) द्वितीय पारितोषिक गौतम गायकवाड (नाटक टकले रे टकले) रंगभूषा- प्रथम पारितोषिक स्नेहा बिराजदार (नाटक: टकले रे टकले) द्वितीय पारितोषिक प्रीती ठाकूर (नाटक: तोच पण गोष्ट निराळी) उत्कृष्ट अभिनय रोपे पदक बळी डिकळे (नाटक : टकले रे टकले) व सायली जोशी (नाटक २८ युगांपासून मी एकटी) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे माधुरी लोकरे (नाटक : कळा या लागल्या जीवा) संपदा झाडगावकर (नाटक : उद्रेक) वर्षा जोशी पाटील (नाटक: धर्मदंड) ऐश्वर्या डावरे (नाटक: अस्वस्थ वल्ली) ऋचा कुलकर्णी (नाटक: सेल्फी) विजय गजभारे (नाटक: जयभिम निळासलाम) सौरभ कुरुंदकर (नाटक: भयरात्र) दिनेश कदम (नाटक: कधी उलट कधी सुलट) शेख दस्तगीर (नाटक: व्यक्त-अव्यक्त) किशोर पुराणिक (नाटक: ड्रीम्स रीले)
               दिनांक २१ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत स्व. दगडोजिराव देशमुख नाट्यगृह, लातूर आणि कुसुम सभागृह, नांदेड येथे अतिशय जल्लोषात संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्य प्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी नांदेड केंद्रावर समन्वयक म्हणून दिनेश कवडे यांनी काम पाहिले आणि परीक्षक म्हणून दीप चहांदे, श्री संजय कुळकर्णी आणि श्रीमती संगीता परदेशी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *