नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी बाफना टी पॉईंट येथील एका हॉटेलसमोरून भोकरच्या मनजित कॉटन या कंपनीचे 50 लाख रुपये चोरीला गेले होते. समांतर तपास करण्याचा अधिकार असणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेने या चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावला आहे. हे चोर सध्या गुजराथ राज्यातील तुरूंगात आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपण ठरवलेले काम करून दाखवतोच हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. पण सध्या ते चोर गुजराथ राज्यातील तुरुंगात आहेत.त्यामुळे त्यांना नांदेडला आणण्यासाठी कायद्याच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
15 डिसेंबर रोजी भर दुपारी भोकर येथील मनजित कॉटन या कंपनीचे 50 लाख रुपये घेवून जाणाऱ्या चार चाकी वाहनातून चोरट्यांनी अत्यंत नियोजनबध्दरितीने ती 50 लाखांची बॅग लंपास केली आहे. पण या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज पाहिला असता चोरट्यासाठी चार चाकी वाहनाची खिडकी उघडीच ठेवण्यात आलेली होती. चोरीचा शोध करतांना नांदेड जिल्हा पोलीस दलाने ज्या बॅंकेतून ही 50 लाखांची रक्कम काढली होती. त्या बॅंकेपासून ते चोरी होणाऱ्या जागेपर्यंतचे असंख्य सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.

भोकर येथील प्रसिध्द मनजित कॉटन या कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.के.7648 यामध्ये एचडीएफसी बॅंकेतून 50 लाख रुपये काढून या कंपनीचा चालक ही गाडी घेवून बाफना टी पॉईंट येथे आला. तो त्या ठिकाणी गाडी उभी करून खाली उतरला गाडीच्या डाव्याबाजूची मागील खिडकी उघडी होती. त्या ठिकाणी थांबलेला एक माणुस त्या खिडकीजवळ गेला आणि त्याने तेथून ती बॅग बाहेर काढली. त्यानंतर हा माणुस गाडीच्या पुढे आला. त्याच्यासाठी त्या चार चाकी गाडी मागून एक दुचाकी स्वार आला आणि त्याला त्याला गाडीवर बसवले. गाडीवर बसतात 50 लाखांची बॅग पकडून बसलेला चोरटा दुचाकीवरुन खाली सुध्दा पडला. पण उजवीकडेच गेलेल्या त्या गाडीच्या ड्रायव्हरला मात्र हा प्रकार कळला नाही. मनजित कॉटनचा गाडी चालक सटवा लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात या बाबत 50 लाखांच्या बॅग चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेचा समांतर तपास करीत नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात या 50 लाखांची बॅग चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावला आहे. हे चोरटे सध्या गुजरात राज्यातील तुरूंगात आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील हे चोरटे भारतभर फिरत असतात. खंडीभर माणसांची टिम या कामात गुंतलेली असते आणि एखाद्या गावात वास्तव करून ही मंडळी सर्वात मोठा हात कोठे मारायचा याचा शोध घेतात आणि मग त्यावर अंमल करत मोठा हात मारतात. असाच हा प्रकार नांदेडमध्ये घडला होता. दि.14 मार्च रोजी इतवारा पोलीस ठाण्याकडून या गुन्हयाची संचिका स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे.
एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणाबाबत तो गुन्हा उघडकीस आणायचाच असे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी ठरवल्यावर त्यांच्या आजपर्यंतच्या कालखंडात त्यांना कधी अपयश आले नाही हे अनेकदा त्यांनी दाखवले आहे. या प्रकरणात सुध्दा त्यांनी या चोरीच्या गुन्याचा शोध लावतांना अनेक पोलीस अंमलदार सुद्धा गेले होते आणि अखेर या 50 लाखांच्या या बॅग चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाच. सध्या हे चोरटे तुरूंगात असल्याने कायदेशीर प्रक्रियेने हस्तांतरण वॉरंट घेवून त्यांना गुजरात येथून नांदेडला आणावे लागेल ही प्रक्रिया कांही दिवसांत पुर्ण होईल.
अत्यंत बारकाईने घडलेल्या गुन्ह्याचा शोध लावून त्यातील गुन्हेगार निश्चित केल्याप्रकरणी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुकच केले आहे. चोरट्यांनी केलेल्या नियोजन बध्द चोरीला अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने अंमलात आणले होते. तेवढ्याच नियोजन बध्द पध्दतीने द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.