नांदेड,(प्रतिनिधी)- धुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराजवळ पोहण्यासाठी गेलेल्या एक २२ वर्षीय युवकाचा जीव गेला आहे.त्याचा मृतदेह गोदावरी जीव रक्षक दलाने नदीतून बाहेर काढला आहे
गोदावरी जीव रक्षक दलाचे मुस्ताक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी काळेश्वर मंदिर जवळच्या घाटावरून सतीश भोंग (२२) रा.दयानंद नगर नांदेड हा युवक पोहण्यासाठी गोदावरी नदी पात्रात उतरला.पण काही तरी दुर्दैव घडले आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.गोदावरी जीव रक्षक दलाच्या सदस्यांनी सतीश भोंगचा म्रुतदेह नदी बाहेर काढला आहे.