नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात गोळीबार करून धुळवड साजरी झाल्याचा प्रकार दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास माळटेकडी पुलावर घडला आहे.फायरिंग प्रकारात एक युवक जखमी झाला आहे.असंख्य पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा सद्या घटनास्थळावर उपस्थित आहे.
आज सर्वत्र धुळवड हा सण साजरा होत असतांना दुपारी ३.३० वाजता माळटेकडी पुलावर फायरिंग झाल्याची माहिती आली.घटनेची माहिती येताच मोठा पोलीस फौजफाटा तेथे पोहचला.पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे,भगवान धबडगे,द्वारकादास चिखलीकर,संजय ननवरे आणि अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार तेथे पोहचले आहेत.
प्राप्त माहितीनुसार कोणी दीपक बिघानिया नावाचा युवक गोळीबारात जखमी झाला आहे.त्याच्यावर उपचार सुरु आहेत.अद्याप हल्लेखोरांची नावे समजली नाहीत.पोलीस शोध घेत आहेत.दीपक बिघानिया बोलत असती तर काही वेळात हल्लेखोरांची नवे पण पुढे येतील.