नांदेड,(प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर बाजार करण्यासाठी जाणाऱ्या एका ६७ वर्षीय माणसाला फसवून त्यांची एक तोळा वजनाची ५० हजार रुपयांची अंगठी काढून नेणाऱ्या ठकसेनाला भाग्यनगर पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले.न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठवले आहे.
मारोती महाजन धोंडगे (६७) रा.आशीर्वाद गार्डन जवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता ते दीप नगर पाटी जवळून बाजार आणण्यासाठी कॅनाल रॉड कडे जात असतांना एका निळ्या रंगाच्या दुचाकीवर एक माणूस आला,त्याने गळ्यात अनेक माळा घातलेल्या होत्या तसेच कपाळावर लाल रंगाचा टीका लावलेला होता. त्याने सांगितले की,मला तुमच्या मुलाने पाठवले आहे.तुमच्यासाठी नवीन सोन्याची अंगठी करायची आहे.त्याने मला पैसे पण दिले आहेत.तेव्हा तुमच्या हातातील अंगठी काढून द्या मला माप घ्यायचा आहे.तेव्हा मारोती महाजन यांनी आपल्या हातातील अंगठी काढून दिली.तेव्हा त्या ठकसेनाने ती एक तोळे सोन्याची ५० हजार रुपये किमतीची विश्वासघात करून घेऊन पळून गेला आहे.
घडलेल्या घटनेची माहिती प्राप्त होताच भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी आपली पलटण कामाला लावली.मेहनत करून भाग्यनगर पोलिसांनी काही तासातच ठकसेन असलेला बाबुलाल बजरंगलाल रौत्रे (५३) यास पकडले.त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६,४२० प्रमाणे गुन्हा क्रमांक ९२/२०२२ दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या कडे देण्यात आला.आज धुळवडीच्या दिवशी न्यायालयाने बाबुलाल बजरंगलाल रौत्रे (५३) यास पोलीस कोठडीत पाठवले आहे.