नांदेड,(प्रतिनिधी)-१० लाखाची खंडणी मागून गाडीचे नुकसान करणारे दोन जण विमानतळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शहरातील गंगानगर सोसायटीमध्ये राहणारे व्यावसायिक रामाश्रय विश्वनाथ सहानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १४ मार्च रोजी रात्री ६.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या चारचाकी गाडीतून घराकडे जात असताना नागेश उर्फ नाग्या गायकवाड आणि आकाश लुळे या दोघांनी त्यांना अडविले आणि आमच्या भावाला तुरुंगातून सोडविण्यासाठी दहा लाखाची खंडणी दे नसता तुझा जीव घेऊ. अशी धमकी दिली. रामाश्रय सहानीने त्यांना पैसे दिले नाही आणि आपल्या घरी गेले. त्यानंतर या दोघांनी रामाश्रय सहानीची चारचाकी गाडी फोडून त्याचे वीस हजार रुपयाचे नुकसान केले. रामाश्रय सहाणे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्र.८६/२०२२ दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला.
विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, दारासिंग राठोड, बंडू कलंदर, गंगावरे आणि गृहरक्षक दलाचे जवान वेंâद्रे यांनी दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन्ही युवकाचा कसोसिशीने शोध घेतला आणि एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन त्यांना काल धुळवडीच्या दिवशी ताब्यात घेवून अटक केली.
आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नागेश उर्फ नाग्या पोचीराम गायकवाड (१९) रा.शिवनगर नांदेड आणि त्याचा सहकारी आकाश गोविंद लुळे रा.तानाजी नगर नांदेड या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर आदींनी विमानतळ पोलीसांचे या कामगिरीसाठी कौतूक केले आहे.