देशासाठी शहिद झालेल्या जवानाच्या अंतिमसंस्कार कार्यक्रमाचे फोटो होकर्णेने पैशासाठी दिले नाहीत-इति.जिल्हा माहिती अधिकारी रापतवार

नांदेड(प्रतिनिधी)-देशासाठी शहिद झालेल्या अंत्यसंस्कारातील छायाचित्रे विजय होकर्णे यांनी पैशासाठी दिली नाहीत अशा अनेक तोंडी तक्रारी असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी आपल्या विरुध्द विजय होकर्णेचे बंधू भारत होकर्णे यांनी दिलेल्या तक्रारीच्या उत्तरात दिल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
दि.13 मार्च रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी रुग्णालय येथे झालेल्या एका शासकीय कार्यक्रमात माहिती अधिकारी विनोद रापतवार आणि याच कार्यालयातील छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यात जुंपली आणि विजय होकर्णेचा बीपीशुट झाला. सध्या ते उपचार घेत आहेत. त्याच दिवशी विजय होकर्णेचे बंधू भारत होकर्णे यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जामध्ये विनंती केली आहे की, विजय होकर्णेला शासकीय काम करतांना अडथळा करणाऱ्या विनोद रापतवार विरुध्द गुन्हा दाखल करावा. यामध्ये मात्र विनोद रापतवार हेच विजय होकर्णेचे बॉस आहेत हे लिहिलेले नाही.
याबद्दल वजिराबाद पोलीसांनी माहिती अधिकारी विनोद रापतवार यांना बोलावून या अर्जाबाबत काय म्हणणे आहे याची विचारणा केली. त्यामध्ये भरपूर खळबळजनक माहिती नमुद असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. विनोद रापतवार हे दोन वर्षापासून माहिती अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. 13 मार्चच्या कार्यक्रमात कार्यालयाचा प्रमुख म्हणून कार्यक्रमासंदर्भाने कसे फोटो हवेत, कसे छायाचित्रीकरण हवेत याच्या सुचना करणे ही माझी जबाबदारी आहे. माझ्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ते काम करून घेणे ही माझी जबाबदारी शासनाने निश्चित केलेली आहे. याबाबत मी माझ्या कार्यालयातील छायाचित्रकार विजय होकर्णे यांना सुचना केल्या तेंव्हा त्यांनीच उलट मला अत्यंत घाणेरड्या शब्दात बुट्टाने मारील असे म्हणाले आहेत. तेथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुध्दा त्यांना सुचना दिल्यानंतर सुध्दा त्यांनी ऐकले नाहीत. कार्यक्रमाचे फोटो काढले नाहीत, चित्रीकरण केले नाही. विजय होकर्णे यांनी केलेला हा सर्व प्रकार कार्यालयीन शिस्तीचा भंग आहे. शासनाच्या कार्यक्रमांचे इतिवृत्त प्रसारमाध्यमांना पाठवणे ही माझी जबाबदारी आहे. तेंव्हा मी माझ्या स्वत:च्या मेहनतीने 13 मार्चच्या कार्यक्रमाचे फोटो काढले, चलचित्रीकरण केले आणि यावेळी इतर कांही लोकांची मदत घेतली.
13 मार्च रोजी घडलेला प्रकार माहिती संचालक प्रशासन मुंबई, माहिती संचालक औरंगाबाद व माहिती उपसंचालक लातूर यांना दिली आहे. याबाबत विजय होकर्णेला शिस्तभंगविषयक कार्यवाही का करू नये अशी नोटीस जारी झाली आहे. दोन दिवसात याचे उत्तर देणे अपेक्षीत आहे. पण तब्बेतीचा कांगावा करून मुदत वाढवून घेण्याची विनंती विजय होकर्णे यांनी केली आहे. कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, वैद्यकीय कारणांनी अनेकदा गैरहजर राहुन नंतर रजा दिल्या. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिटनेस सर्टिफीकेटप्रमाणे त्यांना शुगर आणि बीपी हा जुना आजार आहे याबाबतचे अभिलेख उपलब्ध आहेत. पण आता माझ्या नावावर हे आजार ढकलून नवीनच फंडा तयार करण्याचा प्रयत्न विजय होकर्णे हे करीत आहेत. सोबतच अनेक वेळेस प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण दाखवून त्यांनी शासकीय कामांना वारंवार बगल दिलेली आहे.
विजय होकर्णे यांनी दिलेल्या वैद्यकीय कारणांचे अभिलेख विनोद रापतवार यांनी पोलीसांना दिले आहेत. सोबतच त्यांनी आपल्या जबाबत सांगितले आहे की, छायाचित्रे न देणे, जुन्या छायाचित्रांचे अभिलेख न ठेवणे, परस्पर त्या छायाचित्रांसाठी मोबदल्याची अपेक्षा ठेवणे अशा अनेक तोंडी तक्रारी आलेल्या आहेत. बरेच ऐतिहासीक दस्त त्यांनी कार्यालयात उपलब्ध ठेवलेले नाहीत. सर्व रेकॉर्ड व ऐतिहासीक छायाचित्रे त्यांनी चोरून नेल्याइतपत गंभीर माहिती कागदपत्रांवरुन दिसून येते. जिल्ह्यातील एका शहिद जवानाच्या शासकीय इतमामात झालेल्या अंतिमसंस्काराची छायाचित्रे मिळावी अशी विनंती करूनही विजय होकर्णे यांनी पैशांसाठी ते छायाचित्र दिले नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत.
शासकीय कार्यालयाचा प्रभारी अधिकारी म्हणून मी माझे कर्तव्य बजावले आहे. हे करत असतांना माझ्या सुचनांमुळे बीपी वाढला व जिवास धोका निर्माण झाला असा अर्ज भारत होकर्णे यांनी दिला आहे तो खोटा आहे.नातेवाईकांकडून धमक्या देणे, खोटे अर्ज करणे हे त्यांचे काम आहे. 13 मार्चला ते दवाखान्यात गेल्यानंतर मी एका बोरुबहाद्दरासोबत डॉक्टरांना माहिती विचारली असता त्यांनी त्याला असलेले सर्व आजार हे जुने आहेत त्यातून जिवीताचा कांही धोका नाही असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *