तीन वर्षांपासून फरार सदाचे तीन मारेकरी शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केले

नांदेड,(प्रतिनिधी)- एका युवकाच्या खून प्रकरणातील गेल्या तीन वर्षांपासून फरार तीन आरोपीना शिवाजीनगरचे नूतन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे.

१६ एप्रिल २०१९ रोजी दिवशी सदाशिव उर्फ सदा आनंदा किरकन (२३) या युवकाचा शहरातील बाबानगर भागात खून झाला होता.शिवाजीनगर पोलिसांकडे आनंदा गुणाजी किरकन यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १३९/२०१९ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,१४३,१४७,१४८,३२३ आणि १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार दाखल केला.या तक्रारीत जवळपास ९ जणांवर सदाशिव उर्फ किरकनचा खून केल्याचा आरोप होता.त्यातील तीन जणांना पोलिसांनी पकडलेले आहे.न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे.

या खून प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरूच होता.शिवाजीनगरचे नूतन पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाला आता यश आले आहे.पोलिसांनी निखिल सुरेशसिंह चंदेल (२२) रा.बाबा नगर नांदेड,योगेश बंकटसिंह चंदेल (३४) आणि गणेश बंकटसिंह चंदेल (३४) दोघे रा.रामनगर जुना कौठा नांदेड अश्या तिघांना पकडले आहे.

तीन वर्षांपासून पोलीस शोध घेत असलेल्या आरोपीना पकडून पोलीस दलाचे नाव अंकित करणारे शिवाजीनगरचे पोलीस अधिकारी आणि अमलदारांचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर,सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे,पोलीस अंमलदार दिलीप राठोड,शेख लियाकत, अटकोरे, राजकुमार डोंगरे यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *