नांदेड(प्रतिनिधी)-धुळवडीच्या दिवशी माळटेकडी उड्डाणपुलावर माझ्यावर हल्ला झाला अशी तक्रार संशयास्पद आहे असे वास्तव न्युज लाईव्हने लिहिले होते ते आता जवळपास खरे ठरण्याच्या मार्गावर आहे. नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्या दिवशी घडलेल्या प्रकरणाचा शोध लावून चार जणांना ताब्यात घेतले आहे.
दि.18 मार्च रोजी नांदेड शहरात धुळवड हा सण साजरा होत असतांना गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती प्राप्त होताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी रक्ताचा एक थेंब सुध्दा सापडला नव्हता. पुढे दवाखान्यात उपचार घेणाऱ्या दिपक धरमपाल बिघानीया (30) रा.वाल्मीकनगर नांदेड याने सांगितले की, तोंडाला रंग लावलेल्या दोन लोकांनी माझ्यावर बंदुकीतून हल्ला केला. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 97/2022 कलम 307, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल झाला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले व्हिसल ब्लोअर (खबऱ्या) च्या साह्याने शोध घेतला तेंव्हा त्यांना माहिती प्राप्त झाली की, गोळीबाराचा प्रकार हा वाल्मिकीनगरमध्येच घडला आणि तो प्रकार ईश्र्वरसिंघ गिरणीवाले याने आपल्या साथीदारांसह घडविला होता.
21 मार्च रोजी मध्यरात्रीनंतर पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांनी त्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चार जणांना पकडले. त्यांची नावे ईश्र्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले(24), राधेशाम उर्फ बजरंग अंकुशराव कुंडगिर (25), कुलविंदरसिंघ उर्फ कुणाल नानकसिंघ महाजन(25), गणपतसिंघ उर्फ गणु गेंदासिंघ मठवाले (27), या चौघांना ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या सर्व आरोपींना विमानतळ पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
संवेदनशिल वेळ असतांना झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतुक केले आहे. या पथकात पोलीस अंमलदार गोविंदराव मुंडे, भानुदास वडजे, मोतीराम पवार, पांडूरंग तेलंग, गुंडेराव कर्ले, विलास कदम, देविदास चव्हाण, रुपेश दासरवाड, शंकर मैसनवाड, बालाजी तेलंग, बालाजी मुंडे, शेख कलीम, बजरंग बोडके, विठ्ठल शेळके, महेश बडगु आणि सिमा भोयर यांचा समावेश होता.
वास्तव न्युज लाईव्हने गुन्हा क्रमांक 97/2022 दाखल झाल्यानंतर या तक्रारीमधील संशयास्पद बाबत आपल्या वृत्तातून खुलासा केला होता.खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेला गोळीबाराचा प्रकार हा वाल्मिकनगर भागातील आहे. वाल्मिकनगर हा भाग पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत येतो. घडलेला प्रकार, देण्यात आलेली तक्रार यात आता बरेच तांत्रीक मुद्दे उपस्थित झाले आहेत.
धुळवडीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चार युवक स्थानिक गुन्हा शाखेने पकडले