नांदेड(प्रतिनिधी)-वसरणी शिवारात 25-30 वयोगटातील एक अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला आहे. इतवारा पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे संपर्क साधून माहिती द्यावी.
आज दि.21 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास वसरणी शिवारात एका 25-30 वयोगटातील युवकाचे प्रेत सापडले आहे. या युवकाच्या अंगावर फक्त निळ्या रंगाची पॅन्ट आहे. त्याच्या शरिरावर अनेक जागी जखमापण दिसत आहेत. युवकाचे प्रेत डी.कॅम्पोज आवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, नांदेड ग्रामीणचे अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या आकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत युवकास कोणी ओळखत असेल तर याबाबतची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात द्यावी. युवकाच्या ओळखी बद्दलची माहिती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथील दुरध्वनी क्रमांक 02462-226373 यावर आणि पोलीस उपनिरिक्षक बी.टी.केंद्रे यांचा मोबाईल क्रमांक 9422188871 यावर सुध्दा माहिती देता येईल.
वसरणी शिवारात अनोळखी युवकाचे प्रेत सापडले; पोलीसांचे जनतेला अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन