नांदेड,(प्रतिनिधी)-आज सोमवारी कोरोनाने रुग्णांना सुट्टी दिली आहे.उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ०८ झाली आहे.उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना रुग्णानांची टक्केवारी ३६.३७ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.२१ मार्च रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही.नांदेड मनपा विलगीकरणातील -०१ आणि तालुका विलगीकरणातून-०१,अश्या ०२रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०००९५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे.
आज ५७५ अहवालांमध्ये ५७० निगेटिव्ह आणि ०० पॉसिटीव्ह आहे.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२७९५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०० आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०० रुग्ण नवीन सापडले आहेत.आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे ०८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-०२, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-०६,असे उपचार सुरू आहेत.