नांदेड (प्रतिनिधी)-कपड्याची एजन्सी देतो असे सांगून 13 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील दोघांनाविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तुकाराम मारोती भत्ते रा.चिटमोगरा ता.बिलोली जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑक्टोबर 2020 ते 3 जानेवारी 2021 दरम्यान हुलसुर पोस्ट खेड संगम ता.औराद जि.बिदर(कर्नाटक) येथील अमर भाऊसाहेब जाधव (33) आणि आरती राजकुमार जाधव (30) या दोघांनी तुकाराम भत्तेला विविध नामांकित कपड्याच्या कंपन्यांची एजन्सी देतो म्हणून त्यांच्याकडून 13 लाख 71 हजार रुपये घेतले आहेत. पैसे परत मागितले असता त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुखेड पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 86/2022 कलम 420, 471, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
कपड्याची एजन्सी देतो म्हणून 13 लाख 71 हजारांना गंडवले