
नांदेड- भारत देशात वर्ष २००५ मध्ये पहिल्यांदा जन माहिती अधिकार कायदा अंमलात आणला गेला. देशांतर्गत कार्यरत शासकीय, निमशासकीय, काही खासगी क्षेत्र यांचा माहिती अधिकारी कक्षेत समावेश झाला. नागरिकांना पहिल्यांदाच कार्यालयीन पारदर्शिता निरक्षण घेण्याचे जाणून घेण्याचे अधिकार
( आर.टी.आय.) प्राप्त झाले. स. जगदीपसिंघ पिता मोहनसिंघ नंबरदार सारख्या हुरहुन्नरी आणि सक्रिय कार्यकर्ता देखील याच माहिती अधिकार कायद्याच्या रुपात घडला गेला आणि त्याच्या कडुन एक, दोन, तीन, चार नव्हे तर अंदाजे एक हजारांवर माहिती अर्जाद्वारे माहिती गोळा करण्याचा एक विक्रमच निर्माण झाला असे माझ्या निदर्शनास आले आहे.
जगदिपसिंघ नंबरदार हा भगतसिंघजी मार्गावर राहणाऱ्या एका साध्या आणि गरीब कुटुंबातील जिज्ञासू तरुण. वडील मोहनसिंघ नंबरदार हे महाराष्ट्र खाद्यीग्रामोद्योग येथुन ३८ वर्ष • नौकरी करुन सेवानिवृत्त झालेले घरात चांगले आणि उच्च शिक्षण आत्मसात करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. अशा परिस्थितीतून कुटुंबाचा अधिकारा बदल, समाजाबद्दल आणि आपल्या शहरा विषयाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधात विषया विरुध्द झगडण्याचा इरादा घेवुन जगदीपसिंघ नंबरदार यांने वर्षे २००६ पासून माहिती अधिकार कायद्यामध्ये अर्ज करुन माहिती घेण्यास सुरुवात केली फक्त माहिती गोळा करायचीच नाहीत तर त्या माहितीनुसार अमल बजावणी झालेली आहेत काय? उद्देशित कार्य झालेले आहेत काय? आणि कार्य होत आहे काय? किंवा होणार आहेत काय? या विषयी जिद्द आणि चिकाटीने त्यांने कार्य सुरु केले. विविध माहिती विचारणे आणि त्याचे दायित्व स्मरण करुन देण्यासाठी तो आग्रही ठरला.
त्याच्या महिती अधिकार कार्यामुळे मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांची झोप उडाल्याची मी पाहिलेले आहे. माहिती अधिकार देण्यात दिरंगाई, अनियमितता , संकोच आणि अधिकाऱ्याच्या आरेरावी विरुध्द त्यांने कधी राज्य माहिती आयोगाकडे तर कधी मंत्रालय तर कधी त्या अनुषंगाने न्यायासाठी उच्च न्यायालयाचे द्वार ठोठावले. नांदेड शहर महानगर पालिका संदर्भात गुरुद्वारा रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय तर वेगवेगळे वळण घेत उच्च न्यायालयापर्यंत पोहचला. कार्यवाही साठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीचे संकेत दिले. त्यावर एकच खळबळ उडाली आणि सध्या तो विषय चर्चेत आहेत. आणि श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयाची जागा गुरुद्वारा बोर्डला परत करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका पण दाखल केली आहे. त्याचा निर्णय येणे बाकी आहे. आणि महाराष्ट्र शासनाने गुरुद्वारा बोर्ड निवडणूक नियमाप्रमाणे घेत नसल्यामुळे नंबरदार यांनी नियमाप्रमाणे निबडणूक व्हावी म्हणुन उच्च न्यायालयात याचिकापण दाखल केलेली आहे. त्या याचिकेचा सुध्दा निर्णय येणे बाकी आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.
जगदिपसिंघ नंबरदार यांनी पोलीस विभाग, महसूल विभाग मंत्रालय, जिल्हा परिषद, गुरुद्वारा संचखंड बोर्ड, परिवहन महामंडळ, ई,पी,एफ विभाग नागपुर व औरंगाबाद, उच्च न्यायालय औरंगाबाद व मुंबई, जिल्हा न्यायालय, नांदेड व सिल्वासा, तहसिल कार्यालय, नांदेड ग्रामपंचायत कार्यालय, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी अमृतसर, शासकीय रुग्णालय, नांदेड ना.वा.श.म.न.पा., वनविभाग सह अनेक शासकीय विभागात वेगवेगळ्या विषयाच्या माहितीसाठी अर्ज करुन त्याची माहिती मिळवण्यात यश संपादन केले. वरील माहिती काढल्यामुळे अनेक रेंगाळलेली कामे पूर्णत्व:ला लागली किंवा टाळाटाळ व संभ्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ती कामे करावी लागली. एका प्रकारे सत्य परिस्थिती जनतेसमोर यायला मार्ग मोकळा करण्यास जगदीपसिंघ यांची मोलाची भुमिका आहे असे आपण म्हणु शकतो.
जगदीपसिंघ याची माझ्याशी ओळख २००३ मध्ये झाली. मी एका हिन्दी वर्तमान पत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा शिवसेनेत प्रवेश केल्याची एक बातमी घेऊन तो चिखलवाडी येथील कार्यालयात पोहचा होता. त्यांने एका कागदवरील हस्तालिखित मजकुर माझ्यापुढे ठेवला. नावाने परिचय झाल्यानंतर कळाले की, स. मोहनसिंघ नंबरदार यांचा तो मुलगा मोहनसिंघ नंबरदार हे माझ्या वृत्तपत्राचे नियमित वाचक होते. माझ्याकडे कार्यालयात येवून वर्तमान पत्र वाचणाऱ्यामध्ये त्यावेळेच्या पाठकांशी माझा जिव्हाळा होता. तेव्हा मोहनसिंघ अगदी सहजभावाने यायचे. नंतर जगदीपसिंघ नंबरदार देखील बातम्या प्रकाशित झाल्या आहेत काय याची शहनिशा करण्यासाठी माझ्याकडे येऊ लागला. स्पष्ट बोलणे, खरे बोलणे, विषयाची चौकशी करणे आणि वेळीच प्रतिकार करण्याची त्याची वृत्ती मला नेहमीच आकर्षित करीत गेली. गुरूतागद्दी विकास परियोजना प्रत्यक्ष अंमल बजावणी व्हावी या मताने वर्ष २००३ ते वर्ष २००९ पर्यंत माझे सतत लिखाण आणि पाठपुरावा सुरूच होता. या संघर्षात वेळोवेळी जगदीपसिंघ नंबरदार सहकार्य करण्यासाठी धावून येत. अनेक कठीण प्रसंगात जगदीपसिंघ यास हाक मारली की तो उपस्थित व्हायचा, अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
वर्ष २००९ नंतर जगदीपसिंघ यांची माहिती अधिकार आणि राजकारण विषयींचा सक्रियात वाढली. गुरुद्वारा बोर्डाच्या व्यवस्थापन समितीतील सदस्य स्व. कुलवंसिंघ रागी यांच्या संपर्कात आल्यानंतर जगदीपसिंघ नंबरदार यांची कार्य करण्याची आक्रमकता वाढली. ऍड. राजवंतसिंघ कदम्ब व ऍड. भारत पाटील गाडेगावकर उच्च न्यायालय, औरंगाबाद यांच्या कायदा ज्ञानाचे जगदीपसिंघ नंबरदार यांना वेळोवेळी लाभ मिळत आहे. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. मदनमोहनसिंघ खालसा यांच्या मार्गदर्शनात तो चांगलाच निरखुन बाहेर पडला हे देखील उल्लेख करावे लागेल. सुरुवातील अभ्यासात लक्ष न घालणाऱ्या जगदीपसिंघ नंबरदार यांची आतापर्यंत शिक्षण चालु आहे. (एल.एल.बी.तृतीय वर्ष) याने मात्र हिन्दी व मराठी भाषा आत्मसात करुन त्याचा उपयोग माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागणे, अपील करणे, अर्ज करणे, मजकुर तयार करणे सारख्या कार्यासाठी करण्यास सुरुवात केली याचे मला नेहमीच कुतहूल ही वाटत गेले.
शीख समाजातील बडे नेते, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य, नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता यांच्याशी सतत संपर्क ठेवण्यात जगदीपसिंघ हा यशस्वी झाला आहे. त्याच्याकडे अनेकवेळी चांगल्या बातम्या सुध्दा असतात. म्हणुन शीख समाजातील अनेक जण त्याच्याशी संपर्क करुन असतात. तसेच राजकारणात देखील त्याचे संपर्क चांगलेच पोहचलेले आहे. त्यामुळे आज घडीला आपण म्हणु शकतो की शीख समाजातील तो एक तयार कार्यकर्ता आहे आणि वेगवेगळे विषय हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. दि. २३ मार्च, १९८३ रोजी जन्म लेला जगदीपसिंघ हा भगतसिंघ मार्गावर राहतो. २३ मार्च हा ‘शहीद दिवस म्हणुन साजरा होतो. शहीद भगतसिंघजी, शहीद सुखदेव, शहीद राजगुरु यांची शहिदी या दिवशी झाली आहे. अशा तारखेस जन्म घेतलेल्या व्यक्तीत क्रांतीकारीगुण असणे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. अशा प्रसंगी आपण एकच सदिच्छा व्यक्त करु शकतो कि जगदीपसिंघ नंबरदार यांनी आपल्या ज्ञान, कौशल्य, अनुभवाचे उपयोग चांगल्या आणि सकारात्मक गोष्ठीसाठी करावा. शीख समाजासाठी नविन काय करता येईल, शहरासाठी नवीन काय साधता येईल यासाठी करावेत. जगदीपसिंघ यांच्या जिद्द आणि सक्रियेतेची नोंद युवकांनी घेवुन योगदान द्यावे असे आवाहन मला युवकांना करायचे आहे.
– रवींद्रसिंघ मोदी,पत्रकार