
नांदेड(प्रतिनिधी)- आज शहिद भगतसिंघ, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनी जनशक्ती प्रहार पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 65 जणांनी रक्तदान करून शहिदांना अभिवादन केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांची उपस्थिती होती.
प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगरअध्यक्ष स.प्रितपालसिंघ कमलसिंघ शाहु यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बलिदान दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कायर्र्क्रमात प्रमुख अतिथी नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर, वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ, पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल,कॉ.गंगाधर गायकवाड , सफल खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व उपस्थितांनी शहिदांना अभिवादन केले आणि त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरूवात झाली. या रक्तदान शिबिरात श्री गुरूगोविंदसिंघ रक्तपिढीच्या अधिकारी आणि तंत्रज्ञानी मेहनत घेतली.
या प्रसंगी तहसीलदार किरण अंबेकर म्हणाले आजच्या बलिदान दिवशी आपल्या शहिदांना आठवण करतांना रक्तदान करणे, ही सर्वोत्कृष्ट अभिवादन प्रक्रिया आहे. त्याचे मी स्वागत करतो. रामप्रसाद खंडेलवाल यांनी सर्व उपस्थितांना सांगितले की, शहिदांना आठवण करण्याच्या प्रक्रियेत सर्व युवकांनी कायम सहभाग नोंदवावा जेणे करून आपल्यासाठी बलिदान करणाऱ्यांचा ईतिहास भविष्यातील पिढीला कळत राहिल.
या कार्यक्रमात इतर उपस्थितांमध्ये अजय हनमंते, मल्लीकार्जुन चाकोते, सोनु खालसा, सुरजितसिंघ तबेलेवाले, मोनुसिंघ राघी, सोनुसिंघ राघी, गोपी मुंगल, शेख सदाम, विक्की गवळी, गुरदयालसिंघ सपुरे, हर्षदिप सपुरे, करण सपुरे, उध्दव भोसले, जसबिरसिंघ शाहु, अजितसिंघ शिलेदार, प्रेमजितसिंघ लांगरी, संजय राठोड, राजू तलवारे आदींचा समावेश होता.