नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार अशा तिघांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते 21 मार्च रोजी राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक अविनाश सातपुते नेमणूक जिल्हा विशेष शाखा नांदेड, सेवानिवृत्त राखीव पोलीस उपनिरिक्षक सय्यद जमील सय्यद ईस्माईल आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक खामराव रामराव वानखेडे नेमणूक वाचक शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात पोलीस म्हणून केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांना पोलीस पदक बहाल झाले होते. दि.21 मार्च रोजी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या तिघांना एका भव्य दिव्य समारंभात राष्ट्रपती पदक दिले.
पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरिक्षक अविनाश सातपुते, सेवानिवृत्त राखीव पोलीस उपनिरिक्षक सय्यद जमील सय्यद ईस्माईल आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक खामराव रामराव वानखेडे यांचे पदक प्राप्त केल्याबद्दल पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्विनी जगताप, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, सचिन सांगळे, विक्रांत गायकवाड, विजय डोंगरे, अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जिल्हा विशेष शाखेचे प्रशांत देशपांडे, नानासाहेब उबाळे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, जगदीश भंडरवार, ज्ञानेश्र्वर देवकत्ते, अभिषेक शिंदे, शिवाजी डोईफोडे, डॉ.नितीन काशीकर, हनमंत गायकवाड, शरद मरे, सुधाकर आडे, संजय ननवरे, सोहन माछरे, संजय हिबारे, विकास पाटील, व्ही.व्ही. गोबाडे, अशोक जाधव, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, विशाल भोसले, रवि वाहुळे, विनोद चव्हाण, संजय निलपत्रेवार, महादेव मांजरमकर, माधव पुरी, आर.एस.मुत्येपोड, सुरेश थोरात, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, सचिन सोनवणे, शेख असद, गणेश गोटके,एकनाथ देवके, प्रविण आगलावे, कपिल आगलावे, गोविंद जाधव, बळीराम राठोड,आशिष बोराटे, गोपिनाथ सुर्यवंशी, विशाल सुर्यवंशी आदींसह सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी राष्ट्रपती पदक प्राप्त विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. वास्तव न्युज लाईव्ह परिवार सुध्दा पदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदाराचे हार्दिक अभिनंदन करीत आहेत.