खंडेलवाल रेस्टोरंटच्या मालकांना २९ मार्च पर्यंत अंतरिम अटक पूर्व जामीन

बार्शी,(प्रतिनिधी)- नांदेड येथील खंडेलवाल रेस्टॉरंटच्या मालकांना बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी २९ मार्च २०२२ पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणातील एक आरोपी विदेशात निघून गेला आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

नांदेड येथील प्रसिद्ध खंडेलवाल रेस्टोरंटचे मालक ऍड. निखिल कैलास शर्मा (खंडेलवाल) त्यांचे मोठे बंधू निहाल कैलास शर्मा (खंडेलवाल) आणि भावजयी नीलम निहाल शर्मा (खंडेलवाल) तसेच शर्मा (खंडेलवाल) बंधूचे भाऊजी प्रकाश खंडेलवाल यांच्या विरुद्ध बार्शी येथे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६५/२०२२ दाखल झाला.ती तक्रार ऍड.निखिल यांच्या पत्नीने १५ मार्च २०२२ रोजी दिलेली आहे.त्यात भारतीय दंड संहितेचे कलम ४९८ (अ) ,५०४,५०६,३४ जोडलेले आहे.या प्रकरणाची पोलीस प्राथमिकी दाखल झाल्या नंतर तक्रारीतील एक आरोपी प्रकाश खंडेलवाल हा विदेशात निघून गेल्याचे सांगण्यात आले. तसे प्रकाश खंडेलवाल हे मूळ राहणारे धर्माबाद येथील आहेत.

गुन्हा दाखल होताच नांदेड जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज क्रमांक २५७/२०२२ दिनांक २२ मार्च २०२२ रोजी दाखल करण्यात आला.या अर्जात ऍड. निखिल कैलास शर्मा (खंडेलवाल) त्यांचे मोठे बंधू निहाल कैलास शर्मा (खंडेलवाल) आणि भावजयी नीलम निहाल शर्मा (खंडेलवाल) अशी तीन नावे होती.२४ मार्च रोजीच तो जामीन अर्ज परत घेण्यात आला. दुसरीकडे दिनांक २३ मार्च रोजी बार्शी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक २७२/२०२२  दाखल केला.त्याची पुढील सुनावणी तारीख २९ मार्च मिळाली होती.पण तेथे हा अर्ज २४ मार्चच्या दैनंदिन बोर्डावर घेण्याची विनंती करून त्या दिवशी सुनावणी झाली.तेव्हा न्या.अजितकुमार भस्मे यांनी ऍड. निखिल कैलास शर्मा (खंडेलवाल) त्यांचे मोठे बंधू निहाल कैलास शर्मा (खंडेलवाल) आणि भावजयी नीलम निहाल शर्मा (खंडेलवाल) या तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन २९ मार्च २०२२ पर्यंत मंजूर केला आहे. या अंतरिम अटक पूर्व जामीन मंजुरी आदेशात असे नमूद आहे की,हा आदेश पुढील तारखे पर्यंतच अंमलात आहे.कायदेशीर दृष्टीने आता आरोपीना अंतिम सुनावणीच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक असते असे काही विधीज्ञांनी सांगितले.हा आदेश बार्शी न्यायालयाने बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाठवलेला आहे.

नांदेड मध्ये वकील विचारणा करतात कलम वाढीची 

बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांनतर नांदेड येथील एक स्वतःला प्रख्यात वकील समजणारे अश्या व्यक्तीने नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसोबत बार्शी येथील गुन्ह्यात दखलपात्र आणि गंभीर अशी कलमे वाढवण्याबाबत विचारणा करीत होते अशी खात्री लायक माहिती प्राप्त झाली आहे.या याबाबत सूत्र असेही सांगतात की बार्शी येथील तक्रार सुद्धा याच वकिलांच्या मार्गदर्शनात देण्यात आलेली आहे.मग तेव्हाच कायद्याची ती कलमे जोडली जातील असे शब्द लिहिता आले असते.आता आरोपीना अंतरिम अटक पूर्व जामीन मिळालेला आहे.तेव्हा नांदेडचेच वकील साहेब आरोपीना समजून सांगतील की,मी अशी फिर्याद देण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे ज्यात आपल्याला जामीन लवकर मिळू शकेल.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *