रेतीमाफियांनी माजी सरपंचासह अनेकांवर केला जीवघेणा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-रेतीमाफियांनी माजी उपसरपंचासह त्यांच्या कुटूंबियांना आणि इतरांना मारहाण केल्याचा प्रकार मौजे कांबळज ता.लोहा येथे घडला आहे. पांडूरंग बालाजी भरकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.25 मार्च रोजी दुपारी 12 ते दुपारी 2 यावेळेदरम्यान मौजे कांबळज येथे सार्वजनिक रस्त्यावर संदीप रामराव ढेपे (26) केशव रामराव ढेपे (34), संजय शेषराव जाधव(35), धनराज गोविंद जाधव (25), मधुकर गोविंद जाधव (24), गोविंद शेषराव जाधव (55), राजू संभाजी येडे (32), दत्ता संभाजी येडे(26), मारोती संभाजी येडे (23), संभाजी महाजन येडे (55), कामाजी विश्र्वनाथ भरकडे (38), देवराव दिगंबर भरकडे(35) अशा लोकांनी यातील कांही जण मारतळा ता.लोहा येथील आहेत, कांही चिंचोली ता.लोहा येथील आहेत. कांही जण कामळज ता.लोहा येथील आहेत आणि कांही जण कौडगाव ता.लोहा येथील आहेत. या सर्वांनी पांडूरंग बालाजी भरकडेला अवैध रेती वाहतुकीची तक्रार तहसीलदारांकडे करतोस काय असे सांगून लोखंडी टॉमी, कुऱ्हाडी यांच्या सहाय्याने डोक्यात, पोटाच्या बरगडीवर जखमा करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे. वाळू माफियांनी पांडूरंग भरकडे यांचे काका आणि इतर साक्षीदारांना सुध्दा जबर मारहाण केली आहे. उस्माननगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 56/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 504, 506 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आज दि.26 मार्च रोजीपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास उस्माननगरचे पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *